मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच आता सर्वांसाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. तर मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.
केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात शेती पिकांना यापावसाचा फटका देखील बसला आहे.
15 वर्षांनंतर मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल….

मान्सून आठवडाभर आधीच दाखल, हवामान विभागानं वर्तवला होता 1 जूनचा अंदाज…
नैऋत्य मोसमी पाऊस आज (24 मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी 1 जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. 2009 नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचं IMD नं म्हटलं. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चित्र आहे.