कणकवली,:- कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा – कुंदापुरा विभागा दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी तीन तास मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. १८ जानेवारीला सकाळी १२ ते ३ पर्यंत आणि कुंदापुरा – नंदीकुर विभागा दरम्यान १२.१५ ते दुपारी २.१५ वाजेपर्यंत दोन तासांचा ब्लॉक चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही रेल्वे गाड्यांच्या सवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र. १६५८५ बेंगळुरू ते मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा १७ जानेवारी रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापुरा स्टेशनवर अल्पावधीत थांबेल आणि कुंदापुरा – मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द केला जाईल. गाडी क्र. १६५८६ मुर्डेश्वर ते बंगळुरू एक्स्प्रेसचा १८ जानेवारीला सुरू होणारा प्रवास कुंदापुरा स्थानकापासून त्याच्या नियोजित वेळेनुसार असेल आणि मुर्डेश्वर ते कुंदापुरा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. गाडी क्र. ०६०७६ पनवेल – नगरकोइल या गाडीचा प्रवास १७ जानेवारी रोजी मडगाव – कुमटा विभागादरम्यान तीन तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र.२२११४ कोचुवली ते लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसचा प्रवास १८ जानेवारी रोजी मंगळुरू जंक्शन येथे ६० मिनिटांसाठी नियमित केला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली.
जाहिरात