उद्योग मंत्री उदय सामंत यांचे समवेत जानेवारीत राजापूरात रिफायनरी प्रकल्पाबाबत सभा…

Spread the love

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची शिष्टमंडळाला माहिती..

राजापूर:- प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पामुळे माझ्या कोकणच्या विकासाला नवा आयाम मिळणार असून हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच रिफायनरीच्या प्रस्तावित जागी होणार असल्याची ग्वाही केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रिफायनरी  प्रकल्प समर्थक समन्वय समितीला दिली आहे. तर या प्रकल्पाबाबत केंद्रीय पेट्रोलिय मंत्र्यांची आपण स्वत: पुढील आठवडयात भेट घेणार आहोत. त्यानंतर जानेवारी महिन्यात राजापूरात केंद्रीय उद्योग विभाग व  राज्य शासनाचा औद्योगिक विभागाची संयुक्त बैठक घेवून या प्रकल्पाबाबतची भूमिका जनतेसमोर  मांडणार असल्याची ग्वाहीही नाम. राणे यानी यावेळी दिली.

रिफायनरी  प्रकल्प समर्थक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची नवी दिल्ली येथील उद्योगभवनात भेट घेतली. केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी स्वत: या बैठकीचे आयोजन केले होते. आयोजित केली होती. यावेळी त्यांनी समितीकडून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या आजवरच्या घडामोडींचा आढावा घेतला. तर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी देखील बैठकी दरम्यान संपर्क साधून या प्रस्तावित प्रकल्पाच्या घडामोडींविषयी चर्चा केली. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आजवरच्या महाराष्ट्र शासनाच्या एकुणच कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.

तर हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वीत होण्याच्या दृष्टीने आपण पुढच्या आठवडयात केंद्रीय पेट्रोलियम  मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेवून चर्चा करणार आहे असे सांगितले. राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्रीय भूमिका स्पष्ट करून ती भूमिका येत्या जानेवारीत उद्योगमंत्रालय  केंद्र सरकार आणि उद्योगमंत्रालय महाराष्ट्र सरकार अशी संयुक्त बैठक राजापूरात घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या बैठकीत रिफायनरीच्या प्रकल्पाच्या संदर्भातील सद्यस्थिती पुर्णपणे स्पष्ट केली जाणार असल्याची नाम. राणे यांनी सांगितले.

या नियोजित  बैठकीमध्ये  नारायण राणे यांनी हा प्रकल्प हा माझ्या कोकणच्या विकासाचा असल्याने कोकणातच प्रस्तावित जागी होणार याची पुर्ण ग्वाही समितीला दिली.  या प्रकल्पाने रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यायाने कोकणचा विकास होणार आहे. त्यामुळे कोकणाच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने हा प्रकल्प खुप महत्वाचा असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या संदर्भात नाम. राणे यांनी समिती सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. मी प्रकल्पाच्या पुर्णपणे बाजुने असून केंद्रसरकारही हा प्रकल्प  करण्यासाठी सकारात्मक असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाला बरोबर घेवून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर आमची भूमिका जाहीर करू अशी ग्वाही समितीला दिली.

यावेळी रिफायनरी प्रकल्प समिती समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण, भाजपा  जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, देवाचे गोठणे–नाटे- राजवाडी – सोलगांव प्रकल्प समर्थक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. सुनिल राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रशांत गांगण, आशिष किर, स्थानिक ग्रामस्थ विश्राम परब आदी उपस्थीत होते. यावेळी समितीच्या वतीने नाम. राणे यांना निवेदन देण्यात आले.

       
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला सुमारे 125 ग्रामपंचायती, 55 विविध संघटनांनी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानी  प्रकल्प समर्थनार्थ ठराव केलेले आहेत. तसेच ज्या परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे अशा धोपेश्वर, बारसू, नाटे आणि  राजवाडी या गावांतील 1400 पैकी 1200 कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनी प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यावर या प्रकल्पाचा मार्ग सुकर होणार असल्याचे प्रकल्प समर्थक समन्वय समितीने म्हटले आहे.

रिफायनरी रिफायनरी  प्रकल्प समर्थक समन्वय समितीच्या वतीने सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना निवेदन देताना समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर याप्रसंगी नंदकिशोर चव्हाण, सतेज नलावडे, डॉ. सुनिल राणे, संतोष चव्हाण, प्रशांत गांगण, आशिष किर, विश्राम परब आदी.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page