
गौरव पोंक्षे/माखजन- संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन हायस्कुल ला पंचायत समिती संगमेश्वर ,शिक्षण विभागातील विषय तज्ञ श्री समीर काबदुले यांनी भेट दिली.
यावेळी पॅट चाचणी परिक्षेसंदर्भात पाहणी केली.५ वी ,८ वी, ९ वी पॅट परीक्षा चालू असलेल्या वर्गाना भेटी दिल्या.बैठक व्यवस्था,परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली.शिवाय आगामी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पूर्व तयारी विषयी पर्यवेक्षक श्री अंबादास घाडगे यांचे जवळ चर्चा केली.यावेळी श्री काबदुले यांनी माखजन केंद्रांतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेटी दिल्या. यावेळी पर्यवेक्षक अंबादास घाडगे,गणेश शिंदे,महादेव परब,सचिन साठे,अभिजित सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.