माता न तू वैरीणी…

Spread the love

झोपेत असताना पोटच्या दोन लहान मुलांचा आईने घोटला गळा.

औरंगाबाद- आईनेच पोटच्या मुलांचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलांचा आईनं झोपेतच जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दोन्ही मुलांची आई मनोरुग्ण असल्याची बाब तपासात समोर आली आहे. औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी दोघा बहिण-भावाला मृत घोषीत केलं. अदीबा फहाद बसरावी, असं मृत 8 वर्षीय मुलीचं नाव आहे. तर अली बिन फहाद बसरावी, असं 4 वर्षीय मुलाचं नाव आहे.

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवले आणि त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली, त्यावेळी दोघेही बेशुद्ध असल्याचं आढळून आलं. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिथे मुलांना मृत घोषीत केलं.

मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान होतं. अखेर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं हलवली. त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनंच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आईनं दोन्ही मुलांना नेमकं का मारलं? याचा मात्र उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. पोलीस तपासात, आरोपी आई मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page