रत्नागिरी/ प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये 30 टक्के मराठा समाज आहे.आणि मराठा समाज एवढ्या वर्षानंतर ही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही.
आज समाजामध्ये दारिद्र्य रेषेखालील मोठी संख्या आहे, बेकारी आहे आणि एकूणच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये मराठा समाजाचा वाटा अल्पसा आहे.त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावी व्यवसाय लहान असो वा मोठा असो मेहनत करून आपण तो व्यवसाय यशस्वी करावा म्हणजे आर्थिक सुबत्ता मराठा समाजामध्ये येईल अस माझ मत आहे असे ही खा. नारायण राणे यांनी सांगितले.
मराठा आणि कुणबी वाद नसल्याचे सांगून खा. नारायण राणे यांनी सांगितले की कुणबी मराठा या मताचा मी नाही आहे.वाद वगैरे काही नाही आहे.मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी मराठा म्हणून घेणार नाही कुणबीच आरक्षण नको आहे.
मराठा समाज म्हणून जे घटनेच्या 15 व 16 (चार )मध्ये प्रोविजन आहे.सर्वे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे.
राज्य सरकारने आपला अधिकार वापरावा. असे ही खासदार नारायण राणे यांनी सांगितले.