खेडकर यांच्या पोलिस कोठडीत 2 दिवसांची वाढ:तुरुंगात चांगले जेवण मिळत नाही,मनोरमा यांचा आरोप..

Spread the love

पुणे ,प्रतिनिधी- पुणे जिल्ह्याच्या मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीत २ दिवस वाढ करण्याचे आदेश पौड कोर्टाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी शनिवारी दिले. दरम्यान, पोलिस कोठडीत चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार मनोरमा यांनी कोर्टात केली.

पुणे पाेलिसांना जबाब न देता पूजा यांची दांडी..

पुणे जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी छळ केल्याची पूजा खेडकर यांनी तक्रार केली अाहे. ही तक्रार पुढील तपासासाठी वाशिम पाेलिसांनी पुणे पाेलिसांकडे वर्ग केली. या प्रकरणात पूजा खेडकर यांनी हजर राहून त्यांचा जबाब नाेंदवावा अशी दाेन वेळा नाेटीस पूणे पाेलिसांनी त्यांना बजावली अाहे. शनिवारी त्या पुणे पाेलिसांसमाेर सकाळी अकरा वाजता हजर हाेऊन जबाब नाेंदवणार हाेत्या. परंतु त्यांनी उपस्थित न राहता जबाबास दांडी मारली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page