आम्हाला चिरीमिरी कशाला देता आमच्या शेतकऱ्यांना मदत करा असे सवाल करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही धारेवर धरल्याचं दिसून आलं….

Spread the love

‘आमच्या अनेक महिला तडीपार केल्यात’, मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले..



राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळांवरही जोरदार टीका केलीये. फडणवीस साहेब तुम्हीच भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहे असे बोलण्यास सांगितले, पोलीस अधिकाऱ्यांना आम्हाला गोळ्या घातल्या त्याला तुम्ही बढती दिली, असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत.

मराठे संपवण्यासाठी तुम्ही का उतावीळ झाला आहात? …

आम्ही तुमचे विरोधक नाहीत कोण भुजबळ आणि भुजबळ त्यांचा मी का ऐकावं? आम्हाला चिरीमिरी कशाला देता आमच्या शेतकऱ्यांना मदत करा असे सवाल करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही धारेवर धरल्याचं दिसून आलं. जालन्यात अंतरवली सराटीत ते बोलत होते.

काय म्हणाले मनोज जरांगे? …

“मराठ्यांना मारहाण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या जातीचे पोलीस आणले. अनेक महिला आमच्या तडीपार केल्यात. फडणवीस साहेब तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, फडणवीस साहेब तुम्हीच भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहे असे बोलण्यास सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या त्यालाच तुम्ही बढती दिली. मराठे संपवण्यासाठी तुम्ही का उतावेळ झाला आहात? आम्ही तुमचे विरोधक नाहीत कोण भुजबळ आणि फिजबळ.. 13 टक्के आरक्षण दिल्यावर तुमचे 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले होते. आम्ही आरक्षण मागितले म्हणून त्यांनी उपस्थिती मागितली. आम्हाला चिरीमिरी कशाला देता.. आमच्या शेतकऱ्यांना मदत करा असे म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही टीका केली.

फडणवीस यांना सरळ पाडून टाका असे माझे आवाहन…

देवेंद्र फडणवीस यांना सरळ पाडून टाका, जरांगे यांचे आवाहन
भाजपमधले मराठी आज अस्वस्थ आहेत. मराठा, मुस्लिम, दलित ,12 बलुतेदार, धनगर, बंजारा, आदिवासी सर्व लोक परेशान आहेत. तुम्ही केवळ मतापुरतं काम करता. असे म्हणत फडणवीस यांना सरळ पाडून टाका असे माझे आवाहन असल्याचे मनोज जरंगे म्हणाले. आयुष्यातला सर्वात मोठा फटका 2024 मध्ये तुम्हाला बसणार आहे. उठ की सूट ईडीचे धमकी देत आहेत त्यामुळे सत्ता येणार नाही. लोक सर्वात शेवटी विचार करतील. असे जरांगे म्हणाले.

मला राजकारणात जायचं नाही…

माझी मागणी कुणबी प्रमाणपत्र आरक्षण आणि केसेस मागे घेण्यासाठी आहे. विदर्भ खानदेश ओबीसी आरक्षणात पूर्ण केला आहे. छगन भुजबळ यांच्या एकूण आमच्या पोरांवर अन्याय करू नका आमचे प्रश्न निकाली काढा, असंही ते म्हणाले.

फडणवीसांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर जरांगे यांचे उत्तर…

‘फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला कधीही विरोधक मानले नाही. तुम्हीच आमच्यावर खोट्या केसेस करून आता पश्चाताप करत आहात. राजीनामा देण्यापेक्षा आम्हाला आरक्षण द्या असं जरांगे म्हणालेत. मराठे संपवण्यासाठी तुम्ही का उतावळे झाला आहात’ असा सवाल त्यांनी छगन भुजबळ यांना केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page