
साखरपा- महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि डॉ. बा. सा. को. कृ. वि. दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा, काजू पिक संरक्षण प्रशिक्षण संगमेश्वर तालुक्यातील करंजारी येथिल हॉटेल जिव्हाळा येथे काल मंगळवारी संपन्न झाले
आंबा व काजू पीक संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती देण्यात आले. सदर कार्यक्रमास करंजारी पंचक्रोशीतील चाफवली, देवळे, चोरवणे, भडकंबा, घाटीवळे परिसरातील आंबा व काजू बागायतदार उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणास मार्गदर्शन डॉ.श्री एस. एस. चव्हाण सर यांनी आंबा काजू पीक संरक्षण व कीड रोग याविषयी माहिती व मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांचे चर्चा अंतर्गत शंका व समस्यांचे निरसण करण्यात आले.
तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. विनोद हेगडे यांनी कृषी विभागाच्या योजना- मागेल त्याला शेततळे,PMFME, महाडीबीटी यांत्रिकीकरण, MREGS फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड इ. योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन केले.
तसेच सदरील कार्यक्रमास मा.उपविभागीय कृषी अधिकारी श्री राजेंद्र माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे कृषी विभागाच्या योजनांविषयी माहिती शंका व समस्या यांचे निरसन करण्यात आले तसेच या कार्यक्रमास कृषी सहाय्यक पी. एम.खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले सदरील कार्यक्रमास करंजारी (उपसरपंच) श्री.लक्ष्मण शिंदे (गावकर) श्री.संतोष मावळणकर प्रगतशील शेतकरी श्री.राजेश कोळवणकर श्री.हेमंत हेगिष्टे,श्री.प्रशांत(बापु)शिंदे आणि पत्रकार श्री.प्रकाश चाळके तसेच कृषी सहाय्यक श्री.शिंदे,श्री.यादव आणि श्रीमती नाडेकर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. *मंडळ कृषि अधिकारी श्री.अप्पासाहेब झांजे साहेब यांनी उपस्थित शेतकरी व अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.