ठाणे /मुरबाड /प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ म्हणून संपूर्ण राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटना असून 36 हजाराहून अधिक पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून पत्रकारांचे व कुटुंबाचे आरोग्य, पत्रकारांना घरकुल, पत्रकारांचे इन्शुरन्स पॉलिसी, अशा अनेक पत्रकारांच्या समस्या विषयी लढणारी महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार संघ ही लढाऊ संघटना राज्यात कार्यरत असून त्या संघटनेच्या कोकण विभागीय मुरबाड विधानसभा अध्यक्ष पदाची माळ आज शंकरजी करडे यांच्या गळ्यात पडली असून त्यांच्यावर सामाजिक, राजकीय व पत्रकार क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार संघात इमाने इदबार काम केल्याची पावती आज पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नितीनजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वसंतराव मुडे व राज्यसरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्याआदेशानुसार शंकरजी करडे यांची नियुक्ती केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार संघाचे वसंतरावजी मुंडे यांनी करडे यांना शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवले आहे.
तसेच स्थानिक मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी मुरबाड तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार कोकण विभागीय पत्रकार संघटनेत नामवंत पत्रकारांची वर्णी लागणार आहे असे यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी पत्रकार संजय बोरगे, दिलीप पवार, राजीव चंदने, लक्ष्मण पवार, दीपक चिडा, विलास जाधव हे उपस्थित होते