ठाणे : निलेश घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दिव्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन जम्बो कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. यात तरुण फळी उभी करण्यात आली असून प्रत्येकाच्या खांद्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत आणि मतदानात तरुणांचा वाढता टक्का लक्षात घेत मनसेने देखील यावर अधिक भर दिल्याचे दिसत आहे.
शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेने देखील दिवा शहरावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यामुळेच मागील काही महिन्यात मनसेने ठाणे शहर तसेच दिवा शहरात पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातही शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी देखील मनसेने व्युव्हरचना आखली आहे. त्यानुसार ज्या ज्या भागात मनसे कमी होती, त्या त्या ठिकाणी मनसेने लक्ष घालून मनसेची नवी फळी निर्माण केली आहे.
दरम्यान आता मागील काही निवडणुकांचा विचार केल्यास प्रत्येक निवडणुकीत तरुण मतदारांचा ओढा हा मतदान करण्याकडे अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा मतदारांना आर्कषित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. आता त्यात मनसे कशी पाठी राहणार, त्यांनी देखील तरुण मतदारांना आपलेसे करण्यासाठी पक्षातच तरुणांची फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दिव्यात विविध पदाधिका:यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मनसे आमदार श्री. राजु पाटिल दिवा शहर अध्यक्ष श्री. तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री.कुशाल पाटील दिवा शहर अध्यक्ष, अर्पित शिवाजी पोळ दिवा शहर सचिव, कु.चैतन्य रमेश गावडे दिवा शहर सचिव,
सुभाष नामदेव मुंडे दिवा उपशहर अध्यक्ष,श्री.सोनीश रमाकांत माधव दिवा विभाग अध्यक्ष प्र.४३, वैष्णव प्रभाकर दळवी दिवा विभाग अध्यक्ष प्र.४४,केजू गोरखनाथ मुंडे दिवा विभाग अध्यक्ष प्र.४५,भूषण विलास केंबारी दिवा उपविभाग अध्यक्ष प्र.४३,
स्नेहा धसाल दिवा उपविभाग अध्यक्ष प्र.४३, आकाश संजय भारती दिवा उपविभाग अध्यक्ष प्र.४४,हर्षदा समीर पाटील दिवा उपविभाग अध्यक्ष प्र.४४ गौरव दत्ताराम कदम दिवा उपविभाग अध्यक्ष प्र.४५,ऋतिका पांडुरंग सालप दिवा उपविभाग अध्यक्ष प्र.४५ नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात