
नवीन पनवेल – महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा सत्कार ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांच्या हस्ते मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले आयोजित राजभाषा महोत्सवात करण्यात आला. या प्रसंगी बोलताना सराफ यांनी पहिल्यांदाच असा सत्कार अनुभवल्याचे म्हटले. या आधी सत्कार अनेक झाले, युवांनीही अनेकदा केले, पण सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांनी.. ते ही ज्येष्ठ नागरीकांनी केलेला हा पहिलाच सत्कार म्हणुनच तो विसरता येणार नाही असे अशोक सराफ यांनी म्हटले.
महाराष्ट्र भूषण झाल्यानंतरचा सर्वात पहिला नागरी सत्कार खांदा कॉलनी येथील मनसेच्या कार्यक्रमात करण्यात आला. पनवेल मनसे आयोजित २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी रोजी राजभाषा महोत्सवाचे आयोजन आगरी शिक्षण संस्थेचे मैदान सेक्टर ६, खांदेश्वर मंदिरासमोर, खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खेळ भाग्यलक्ष्मीचा आणि हळदी कुंकू समारंभ पार पडला. २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला आणि हभप संग्राम बापू भंडारे महाराज यांचे कीर्तन आयोजन केले होते. २५ फेब्रुवारी रोजी श्री नटेश्वर नाट्य रंग म्हणजे यांचे बहुरंगी नमन आयोजित करण्यात आले.
२६ फेब्रुवारी रोजी राहुल सोलापूरकर यांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या विषयावर धकधकते व्याख्यान आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी शाहीर वैभव घरत त्यांचे अंगावर शहारे आणणारे महाराष्ट्राचे पोवाडे आयोजित करण्यात आले आहे. सर्व पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठा, खारघर, तळोजा ग्रामीण भाग, शहर पदाधिकारी व इतर पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांना हजर राहण्याचे आवाहन मनसे प्रवक्ता तथा शहराध्यक्ष, पनवेल योगेश चिले यांनी केले आहे.