महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी मिऱ्या गावात ग्रामदेवतेचे घेतले आशीर्वाद…

Spread the love

रत्नागिरी : मिऱ्याच्या पवित्र भूमीत श्री नवलाई पावलाई देवीच्या आशीर्वादाने आज पदयात्रेची सुरुवात केली, आणि जोशात, प्रेमात आणि उत्साहात ग्रामस्थांसोबत ही यात्रा अधिक प्रेरणादायी बनली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि माझ्या सोबत असलेल्या बंधू-भगिनींच्या साथीत प्रत्येक पावलागणिक एक नवा विश्वास मिळत आहे, असे बाळ माने म्हणाले

गावातील दत्त मंदिरात श्री दत्तात्रयाचे आशीर्वाद घेतले. गावकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या, अडचणी, आणि त्यांच्या मनातील विचार जाणून घेतले.

आपल्या सहवासात जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती या यात्रेचा खरा प्राण आहे! एकत्र येऊन आपल्याला प्रगतीची नवीन क्षितिजे गाठायची आहेत. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमच्या आशिर्वादातून ही पदयात्रा नक्कीच एक नवी उमेद देईल, जेणेकरून गावाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बदल आणि विकास घडवून आणता येईल,असे मनोगत बाळ माने यांनी व्यक्त केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page