राजापूर तळवडे राववाडी येथे आग लागून काजू कलमांचे नुकसान

Spread the love

राजापूर :- तळवडे राववाडी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सदाशिव कलमस्टे यांच्या काजू कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . जळाऊ लाकडाचा ढीग जळून खाक झाला . ग्रामस्थांच्या प्रयत्नाने दोन घरे आगीपासून वाचविण्यात यश आले .
वीज उपकरणात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे . सुरेश गुडेकर यांच्या घराशेजारी ही घटना घडल्याने त्यांनी तत्काळ सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले . महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली . आग आटोक्यात आणण्यासाठी काशिराम कलमस्टे , सुरेश बने , तानाजी गोसावी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page