लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; देशात सात टप्प्यात मतदान, 4 जून रोजी निकाल…

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसंच महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर, चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई – भारतीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळं संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेबरोबरच ४ राज्यांच्या निवडणुका आणि ९ राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकाही निवडणूक आयोगानं जाहीर केल्या. एकूण 7 टप्प्यात या निवडणुका होतील. याआधी शुक्रवारी नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसंच सुखबीर सिंग संधू यांनी पदभार स्वीकारला. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे.

चार राज्याच्या विधानसभा निवडणुका…

लोकसभेबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही आज ठरवल्या आहेत. लोकसभेच्या 543 जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल दरम्यान मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्यात 26 एप्रिलला मतदान होईल. तिसऱ्या टप्याचं मतदान 7 मे रोजी, चौथ्या टप्याचं मतदान 13 मे रोजी, पाचव्या टप्याचं मतदानाला 20 मे रोजी, सहाव्या टप्याचं मतदान 25 मे रोजी, सातव्या टप्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. निकाल 4 जून रोजी लागेल.

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये होणार निवडणूक…

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे रोजी महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिल २०२४ रोजी होणार आहे.

🔹️महाराष्ट्रात कधी आणि कुठे मतदान ?

▪️पहिला टप्पा 19 एप्रिल :

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

▪️दुसरा टप्पा 26 एप्रिल :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

▪️तिसरा टप्पा 7 मे :

रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

▪️चौथा टप्पा 13 मे :

नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

▪️पाचवा टप्पा 20 मे :

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

2 कोटी नवीन मतदार नोंदणी :

2024 लोकसभेत 96.8 कोटी लोक मतदान हक्क बजावणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी, निवडणूक आयोगानं सर्व 28 राज्ये तसंच 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल जारी केला होता. त्यात आयोगानं म्हटलं होतं की, मतदान यादीत 1.82 कोटी नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6% वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 96.88 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत.

साड्या, पैसे, मद्य यांचं वाटप केल्यास कारवाई…

निवडणुकीत दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलाय. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही. मनी आणि मसल पॉवरला निवडणुकीत थारा नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर राहणार असून, असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलाय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page