ठाणे : निलेश घाग दिवा – आगासन गावात ठाणे महानगरपालिकेने टाकलेल्या १३ हेक्टर जमिनीवर विविध आरक्षणा विरोधात आगासन गाव संघर्ष समितीच्या वतीने रविवारी संध्याकाळी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने आगासन येथील भूखंडांवर विविध सुविधांचे आरक्षण टाकले असून यामध्ये प्रभाग समिती कार्यालय, पोलीस स्टेशन,अग्निशमन दलाचे कार्यालय,रुग्णालय, गार्डन यासारखी विविध आरक्षण टाकण्यात आली आहेत. नुकतेच ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आगासन गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण केले. ग्रामस्थांचा विरोध असताना जबरदस्तीने झालेल्या सर्वेक्षणामुळे आगासन मधील नागरिकात तीव्र नाराजी आहे. संपूर्ण दिवा शहरातील विविध सुविधांची आरक्षण एकाच जागी का?असा प्रश्न आगासन गावातील स्थानिकांनी विचारला आहे.
आगासन गावातील ग्रामस्थांनी आपल्या जमिनी अनेक वर्ष जोपासल्या त्या मोकळ्या ठेवल्या त्या ठिकाणी ते शेती करतात, त्या ठिकाणी त्यांनी बांधकाम केली नाहीत म्हणून त्यांनाही शिक्षा दिली जाते का? असा प्रश्न यावेळी सभेला संबोधित करताना रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला. या सभेमध्ये आरक्षणा हटवण्याचा लढा तीव्र करण्याचा निर्धार आगासन गावातील ग्रामस्थांनी केला त्याचबरोबर जोपर्यंत आगासन गावातील महापालिकेने टाकलेले अन्यायकारक आरक्षण हटवले जात नाही तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ याचा तीव्र विरोध करतील असा निर्धार या सभेत करण्यात आला. या सभेला प्रमुख पाहुणे संतोष केणे,मधुकर माळी,तानाजी पाटील,आगासन गाव संघर्ष समिती व गावातील स्थानिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात