जेएसडब्ल्यूविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक ; हायटेंशन लाईनविरोधात नागोठणेतील शेतकर्‍यांचे तहसिलदारांना निवेदन…

Spread the love

*रोहा-* नागोठणे विभागातील पळससह चार गावांतील शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच त्यांच्या शेतजमिनीमधून हायटेंशन लाईन नेण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीने सर्वेक्षण करून जमिनी परस्पर घेण्याचा घाट घातला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात या चारही गावांतील शेकडो ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना याविरोधात निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षियांनी पाठिंबा दिला आहे.नागोठणे विभागातील पळससह चार गावांतील शेतकर्‍यांना विश्वासात न घेताच त्यांच्या शेतजमिनीमधून हायटेन्शन लाईन नेण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीने सर्वेक्षण करून जमिनी परस्पर घेण्याचा घाट घातला आहे.

*कंपनीचा मनमानी कारभार…*

कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात या चारही गावांतील शेकडो ग्रामस्थ आक्रमक झाले असून रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना याविरोधात निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षीयांनी पाठिंबा दिला आहे.

*स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही…*

वडखळ येथील जेएसडब्ल्यू कारखान्यासाठी महावितरणच्या कानसई सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता, नागोठणेमार्गे वडखळपर्यंत विजेचे टॉवर उभे करुन उच्च दाबाच्या वाहिन्या खेचल्या जाणार आहेत. या हायटेन्शन
लाईनसाठी कंपनीने सुमारे 30 किलोमीटर अंतरातील जमिनींचे सर्वेक्षण करताना स्थानिक शेतकर्‍यांना विश्वासात घेतले नाही.

टॉवरसाठी बाधित होणार्‍या जागेपोटी काही शेतकर्‍यांना फसवून सहा ते सात लाख रुपयांचे धनादेश दिले आहेत. मात्र ही लपवाछपवी उघडकीस आल्यानंतर शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली. या चार गावातील शेतकर्‍यांनी रोहा तहसीलदार किशोर देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच विद्युत परेशनचे कानसई सबस्टेशन येथे निवेदन दिले आहेत.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, अजित शिर्के, नागोठणे उपविभागप्रमुख ज्ञानेश्वर शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय विचारे, परेश विचारे, सचिन शेलार, नितीन शिर्के, शाखाप्रमुख चंद्रकांत दुर्गावले,उपशाखाप्रमुख विक्रम दुर्गावले, शशिकांत शिर्के, निडी गावचे माजी सरपंच धर्मा भोपी, हरिश्चंद्र मढवी, वागळीचे माजी सरपंच रामू कदम, शिवराम कदम, शिवगावचे ग्रामस्थ गणेश म्हात्रे, चंद्रकांत बोरकर, सचिन बोरकर, शेतपळस ग्रामपंचायतीचे सदस्य सतीश डाकी,नितीन घासे आदी उपस्थित होते.

*…तर तीव्र आंदोलन करु*

प्रशासनाला हाताशी धरुन काम रेटण्याचे प्रयत्न केले तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page