LIC ने लाँच केला नवा इन्शुरन्स प्लॅन; जाणून घ्या काय आहे पॉलिसी आणि कसा होणार फायदा?

Spread the love

डिजिटल दबाव वृत्त

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी LIC Index Plus ही नवी इन्शुरन्स प्लॅन योजना सादर केली आहे. (LIC Index Plus) या योजनेचा लाभ विमाधारकाला विम्यासोबत बचत करून घेता येणार आहे. या योजनेत गुंतवणूकदार ६ फेब्रुवारी २०२४ पासून गुंतवणूक करू शकणार आहेत. ही योजना नेमकी कशी काम करते आणि याचा कसा लाभ घेता येईल..? याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत.

एलआयसी इंडेक्स प्लस प्लॅन म्हणजे नक्की काय?

एलआयसी इंडेक्स प्लस प्लॅनविषयी सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर ही एक युनिट लिंक्ड, नियमित प्रीमियम आणि वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी आहे. जी पॉलिसीच्या पूर्ण मुदतीदरम्यान विमाधारकाला जीवन विमा संरक्षण आणि बचत करण्याची संधी देते. अर्थात एलआयसी इंडेक्स प्लसच्या अंतर्गत, हि पॉलिसी लागू असेपर्यंत गुंतवणूकदाराला विम्यासोबत बचत करण्याची संधी मिळते. (LIC Index Plus) तसेच, ही एक युनिट लिंक्ड स्कीम असल्यामुळे गुंतवणूकदाराला सर्वोत्तम दोन गुंतवणुकीचे पर्याय मिळतात. एक एक म्हणजे फ्लेक्सी ग्रोथ फंड आणि दुसरा फ्लेक्सी स्मार्ट ग्रोथ फंड. ज्याच्या माध्यमातून आपण निफ्टी १०० आणि निफ्टी ५० शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणूकदार होण्यासाठी वयोमर्यादा काय असावी?

एलआयसी इंडेक्स प्लस प्लॅन या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय किमान ९० दिवस असणे गरजेचे आहे. तसेच विमा रक्कम लक्षात घेता त्याच्या आधारावर, जास्तीत जास्त ५० आणि ६० वय वर्ष असणारी व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. (LIC Index Plus) विम्याची रक्कम हा यामध्ये महत्वाचा घटक असून योजनेच्या मॅच्युरिटीसाठी किमान वय १८ तर कमाल ७५ आणि ८५ वर्षे आहे. या योजनेत वयाच्या ९० दिवसांमध्ये प्रवेश केल्यास विमा रक्कम वार्षिक प्रीमियमच्या ७ ते १० पट असेल. याशिवाय महत्वाचे असे कि, ५० वर्षे वा त्याहून अधिक वयाच्या गुंतवणूकदाराच्या प्रवेशावर प्रीमियम विमा रकमेच्या ७ पट असणार आहे.

एलआयसी इंडेक्स प्लस प्लॅन या पॉलिसीची किमान मुदत १० वर्षे ते १५ वर्षे इतकी आहे. तसेच या पॉलिसीत जास्तीत जास्त २५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. हि पॉलिसी सुरु केल्यानंतर ५ वर्षांचा लॉक- इन कालावधी असतो. त्यानंतर आंशिक पैसे काढता येतात. (LIC Index Plus) लक्षात घ्या,

 यातील कमाल प्रीमियमवर मर्यादा नसली तरी मासिक आधारावर २,५०० रुपये, तिमाही आधारावर ७,५०० रुपये, सहामाही आधारावर १५,००० रुपये आणि वार्षिक आधारावर किमान ३०,००० रुपये भरावे लागतील

एलआयसी इंडेक्स प्लसचे फायदे काय?

एलआयसी इंडेक्स प्लस या पॉलिसीचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एकतर विमाधारकाला विम्यासह बचत करण्याची संधी मिळते. शिवाय या योजनेचा ५ वर्षांचा लॉक- इन कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदाराला आंशिक पैसे काढता येतात. योजनेतील रक्कम ही विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडे सुपूर्त केली जाते. तसेच युनिट फंडात जमा केलेली रक्कम हि मॅच्युरिटीवर दिली जाते. (LIC Index Plus) या योजनेअंतर्गत ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडरचादेखील पर्याय आहे. ज्यामध्ये एखाद्या अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अतिरिक्त आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते. ज्यामध्य उत्पन्न बदलण्यात, कर्ज फेडण्यात आणि भविष्यासाठी बचत करण्यासाठी अतिरिक्त पैसे दिले जातात. परिणामी, विमाधारकाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास त्याच्या प्रियजनांना अतिरिक्त आर्थिक संरक्षण मिळते.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page