संगमेश्वर- गेली 25 वर्ष दुर्गा मातेची स्थापना रेडीज कुटुंबीय करत आहेत आज आपण जाणून घेऊया लेडीज कुटुंबीयांनी नवरात्र विशेष मधून देवीच्या स्थापने पासून आजपर्यंतची माहिती.
दिनांक ४~१०~२०२२ संगमेश्वर बाजारपेठेत गणेश रेडीज यांच्या निवासस्थानी दुर्गा मातेच्या मूर्तीची विधी-वत स्थापना करण्यात येते. यंदा २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. २५ वर्ष अखंड सेवा रेडिज परिवाराकडून केली जात आहे. दुर्गा मातेच्या या उत्सवासाठी एक महिना आधी तयारी करावी लागते. मदतीला घरातील माणसे, मित्र परिवार, आणि नातेवाईक येत असतात.
सौ.गायत्री गणेश रेडीज, श्रीमती. हर्षना हरिश्चंद्र रेडीज, श्री.अनंत सुधाकर पाटणे सौ.अस्मिता अनंत पाटणे. यांचे या उत्सवासाठी मोलाचे योगदान आहे. या सर्वांमुळे च २५ वर्ष श्रीदेवी दुर्गामातेची सेवा करण्याची संधी मिळाली असं गणेश रेडिज सांगतात.
प्रत्येकाने कामाची जबाबदारी स्वतः घेऊन मनोभावे सेवा केली आहे. परिवारातील एकाही सदस्यांने जागरणाचा, कामाचा त्रास होत आहे. अशी कधी तक्रार केली नाही. हसून खेळून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा त्यांचा मानस दिसून येतो.
विशेष आभार मानायचे ते आमच्या सर्वांचे लाडके भाओजी. श्री.अनंत सुधाकर पाटणे. खेड सध्या ते देवरूख येथे राहतात. तिथे त्यांचे दुकान आहे. नवरात्री उत्सव यायच्या महिनाभर आधी उत्सवाला काय काय पाहिजे, याची पुर्ण जबाबदारी भाओजी बघतात. खर्च करायला पण मागे पुढे बघत नाहीत .उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास असतो.
रोज सकाळी देवरूख वरून संगमेश्वरला यायचे. परत रात्री देवरूखला जाऊन परत सकाळी लवकर संगमेश्वरला हजर होतात.
भाओजीनी गेली २५ वर्ष श्रीदेवी दुर्गा मातेची मनोभावे सेवा केली आहे. त्यांच्या मुळेच हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, हे बोलणं वावगं ठरणार नाही.
जेवणापासून, ते होम हवन, महाप्रसाद, पूजा,ब्राह्मणांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीं बारकाईने लक्ष ठेवून पूर्ण करण्याची जबाबदारी भाओजी उचलत असतात. आपल्या व्यक्तीचे आभार मानायचे हे चुकीचे आहे. पण त्यांच्या सेवेची दखल घेणे आपले कर्तव्य आहे. भाओजी तूमच्या मुळे हे सर्व शक्य झाले आहे. हे मानायलाच हवे.
यंदा २५ वे वर्ष म्हणून खास मूर्ती पेण, हमरापूर येथील सुप्रसिद्ध कलाकार यांच्या कार्यशाळेतून आणण्यात आली. तिला खरोखरचा भरजरी शालू नेसवण्यात आला आहे. मूर्ती पुर्ण तयार झाल्या वर खरोखरच प्रगट झाल्याचा भास होतो. येवढं सुंदर काम झाले आहे.
संगमेश्वर मध्ये एकच दुर्गा मातेची मूर्ती यांच्याकडे असल्याने असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे. शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. तेवढेच नारळ,अगरबत्ती, ओटी,
खण ,हार आणि प्रसाद घेऊन भाविक श्रध्देने दर्शनासाठी सहपरिवार नऊ दिवस येत असतात.
रोज दोन वेळा आरती,रात्री गरबा, भजन असतात. भजन मंडळींची जेवणाची सोय केली जाते. त्या निमित्ताने लोक आपल्या कडे येतात या भावनेने रेडीज परिवार सर्वांना काही कमी पडून देत नाही.
स्वतः नऊ दिवस उपवास कडक करतात.फक्त दुध पिऊन असतात. हा कडक उपवास गणेश आणि वहिनी करतात.
आता या उत्सवाची सुरूवात कशी झाली याची थोडी माहिती घेतली. ती अशी पंचवीस वर्षांपूर्वी दोन वर्षे गरबा नृत्य नाना सुर्वे यांच्या बंगलीसमोर ओपन तिठ्यावर खेळला जात असे. देवीच्या नावाने उत्सव साजरा करत असत.
त्यावेळी गणेशचे वडील ( हरीश्चंद्र रेडीज) यांनी नवस केला होता मी पुढच्या वर्षी उत्सव मंडळाला मूर्ती देईन. हा नवस त्यांनी मनात केला होता. मग पुढच्या वर्षी होणारा गरबा नृत्य काही कारणास्तव बंद झाला. नवस बोलल्या नुसार मूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर पण देऊन झाली होती. मूर्ती पण तयार होती. आता काय करायचे या विचारात असल्याने त्यांनी नवसाच्या बाबतीतली सर्व माहिती घरी सांगितली. गणेश, गणेशची बहिण ,आई यांनी नवस असल्याने घरातच देवीची मूर्ती बसवण्यासाठी तयारी दर्शविली आणि आता बघता बघता २५ वर्ष दुर्गा माता आपली मनोभावे सेवा त्यांच्या कडून घेत आहे. आणि ते ही समाधानाने देवीची पूजा अर्चा करत असतात.
आज गणेशचे वडील नाहीत पण आई,पत्नी, बहिण ,भावोजी, संजय रेडीज यांचा परिवार, नातेवाईक, आणि मित्र परिवार यांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
यंदा २५ वे वर्ष. दुर्गामातेची सेवा मनोभावे केली आहे. आता थांबण्याचा विचार केला आहे. पुढच्या वर्षी मूर्ती नाही बसवणार हे ऐकल्यावर असंख्य भाविकही गहिवरून गेले आहेत. खुप जणांचे श्रध्दास्थान आहे.
पुढच्या वर्षी यांच्या संपूर्ण परिवाराला आणि भाविकांना नवरात्री उत्सवाच्या वेळी चुकल्या सारखे वाटत राहाणार.
भाविक त्या काळात यांच्या निवासस्थानी जाऊन ज्या ठीकाणी दुर्गा मातेची मूर्ती बसवण्यात येत होती. त्या ठीकाणी नतमस्तक झाल्या शिवाय त्यांचे समाधान होणार नाही.
रेडीज परिवार यांनाही या पुढे कोणतीही कमतरता भासणार नाही. दुर्गामाता कायम तुमच्या पाठीशी उभी राहील तिची सदैव कृपा द्रुष्टी तुमच्या परिवारावर आणि भाविकांवर राहील.