राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात सहा राज्यामध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. तर तीन राज्यांमध्ये खांदेपालट करण्यात आले आहेत. हरिभाऊ बागडे यांची राज्यस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या राजकीय कारकीर्दविषयी जाणून घ्या.
*नवी दिल्ली-* राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी राजस्थान, तेलंगणा आणि झारखंडसह 9 राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली आहे. झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राज्यस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
*औरंगाबादमध्ये जन्म…*
हरिभाऊंचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ रोजी औरंगाबादच्या चित्तेपिंपळगाव येथे झाला.१९८५ मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ मध्ये फुलंबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक जिंकली. त्याच मतदारसंघातून त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूकही जिंकली. २०१४ मध्ये भाजपानं महाराष्ट्रात पहिले सरकार स्थापन केलं. तेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. ते महाराष्ट्र सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. तसंच महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री पदही त्यांनी भूषविले आहे.
*वयाच्या १३ व्या वर्षी संघात प्रवेश…*
हरिभाऊ यांना ‘नाना’ नावानंही ओळखंल जातं. वयाच्या १३ व्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. पूर्वी त्यांची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षे औरंगाबादच्या फुलंबारी येथे वर्तमानपत्रेही विकली. वृत्तपत्रं विकतानाच त्यांनी लोकांशी जनसंपर्क वाढविला. त्यांची लोकप्रियता बघून भाजपानं त्यांना १९८५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेचे तिकीट दिलं. तेव्हा ते पहिल्यांदाच आमदार झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत नेत्यांनाही मदत केली.
*हरिभाऊ बागडे राज्यस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्त ….*
*मुख्यमंत्र्यांनी ओम माथूर यांचे अभिनंदन केले-*
राष्ट्रपतींनी राजस्थानचे भाजपा नेते ओमप्रकाश माथूर यांच्याकडे सिक्कीमच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजस्थानमधील पाली येथील माथूर यांनी यापूर्वी गुजरात राज्याच्या प्रभारीसह भाजपा संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. मुख्यमंत्री भजन लाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ओम माथूर यांचे अभिनंदन केले. त्यामुळे गुलाबचंद कटारिया यांच्याकडे आता आसामऐवजी पंजाबची कमान सोपवण्यात आली आहे. कटारिया हे आतापर्यंत आसामचे राज्यपाल होते. त्यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. उदयपूरचे रहिवासी असलेले कटारिया हे यापूर्वी राजस्थानचे गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत.