पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचीही उपस्थिती….जनतेची सेवा करण्यासाठी ताकद दे; प्रशांत यादव यांची मार्लेश्वरचरणी प्रार्थना….
वाशिष्ठी डेअरीच्यावतीने श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्री आज दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांना फळे, दूध आणि प्रसादाचे वाटप
*देवरुख-* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आज सकाळी श्रावणी सोमवारनिमित्त सहकुटुंब प्रसिद्ध मार्लेश्वर तीर्थक्षेत्री जावून स्वयंभूश्री देव मार्लेश्वराचे दर्शन घेतले. व मार्लेश्वर देवाला त्यांनी अभिषेकही घातला. यावेळी जनतेची सेवा करण्यासाठी ताकद दे अशाप्रकारची प्रार्थना प्रशांत यादव मार्लेश्वरचरणी केली. दरम्यान वाशिष्ठी डेअरीच्यावतीने श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दर श्रावण सोमवारी भाविकांना फळे, दूध आणि प्रसादाचे वाटप केले जात आहे. आज दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांना फळे, दूध आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भक्तगणांनी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांना धन्यवाद दिले आहेत.
यावेळी प्रशांत यादव यादव यांच्यासोबत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव, कु. स्वामिनी प्रशांत यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा साळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुखचे शहराध्यक्ष निलेश भुवड, चिपळूणचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, दीपक भेरे, वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, महेश खेतले, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी पाडगावचे जंगम महादेव साळवी यांनी अभिषेक केला. तर मार्लेश्वर ट्रस्टच्या वतीने रुपेश सावंत यांनी प्रशांत यादव आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले.
वाशिष्ठी डेअरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या दोन्ही माध्यमातून माझ्या हातून लोकाभिमुख कार्य घडो आणि माझ्या जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मला अधिक बळ मिळो तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी, युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि महिलांना, तरुणीना सक्षम करण्यासाठी माझ्या हातून कायम विधायक कार्य घडो, अशी प्रार्थना करत प्रशांत यादव श्री देव मार्लेश्वरच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी कार्यकर्त्यांनीही प्रशांत यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि यादव कुटुंबाला त्यांचे सामाजिक कार्य अखंडित सुरू ठेवण्यासाठी दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना यश मिळो, असे साकडे श्री देव मार्लेश्वरच्या चरणी घातले. यावेळी प्रशांत यादव यांनी देवस्थान ट्रस्ट प्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.