
महाराष्ट्र : मुंबई हे मराठी माणसांचं शहर असल्याचं बोललं जातं.
याच शिव छत्रपतींच्या स्वराज्यात मराठी माणसांवर अन्याय होताना अनेक प्रसार माध्यमांवर आपणास पहावयास मिळते. परराज्यातून स्वतःचे पोट भरण्यास आलेला परप्रांतीय इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या बाबतीत त्रास दिल्याच्या मुंबई, कोकण किंवा महाराष्ट्रात घटना दररोज घडत असतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर बेदाणे विक्री
करणाऱ्या रा. सांगली जिल्हा जत तालुक्यातील प्रशांत पाटील उच्च पदवीधर शेतकऱ्याच्या मुलाला स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून त्रास देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे रवींद्र कुवेसकर यांनी या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी . वायरल विडियोला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.

यावेळी प्रशांत पाटिल त्याला स्थानिक प्रशासनाकडून विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आणि नाहक त्रास देण्यात आला. ईतर करणारे बिनधास्त विक्री करीत आहेत त्यांना मात्र कोण काही करत नाही कारण ईतर विक्री करणारे हप्ते देतात म्हणून मुंबईत मराठी माणसालाच धंदा करू देत नाहीत.” असा आरोप या व्हिडिओमध्ये रवींद्र कुवेसकर महाराष्ट्र संरक्षण संघटनेकडून करण्यात तसेच मराठी माणसांवर कुठलीही प्रकारचा अन्याय झाल्यास आला आहे संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले

सदर व्हिडिओमध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाची व प्रशासनाची पोलखोल केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर, ट्विटर वर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.
त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थानिक प्रशासनाला इशारा दिला.
जाहिरात




