
देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या बॅचचे कौशल्य प्रशिक्षण गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ प्लंबिंग टेक्नॉलॉजी, पुणे या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. या पहिल्या बॅचचा प्रशिक्षण कालावधी दोन महिने असून, या प्रशिक्षणांतर्गत देवरुख व पुणे येथील प्रशिक्षणाचा समावेश आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने नव्यानेच सुरू केलेल्या या उपक्रमास युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. प्रशिक्षणाकरिता संस्थेने सुसज्ज कार्यशाळा व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.
प्रशिक्षण वर्गाच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, डॉ. चंद्रशेखर केदारी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उपस्थित राहून पहिल्या बॅचला शुभेच्छा दिल्या. गुरुकुल संस्थेकडून श्री.सोमनाथ कुलकर्णी व तांत्रिक प्रमुख श्री. सुरज पाटील हे उपस्थित होते. युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन सदर प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.
तरी इच्छुक युवकांनी या कौशल्य प्रशिक्षण वर्गाकरिता नोंदणी करावी असे आवाहन संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले आहे. प्रशिक्षण व प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीकरिता समन्वयक प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा.अभिनय पातेरे यांच्याशी संपर्क साधावा. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी नियोजनाकरिता महाविद्यालयातील तांत्रिक सहाय्यक संतोष जाधव, संस्था कार्यालयातील किरण चाचे, सहाय्यक हेमंत कदम, अमोल वेलवणकर व विलास तावडे यांनी परिश्रम घेतले.
*फोटो-* प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष श्री. भागवत, सौ. जोशी, श्री. पाटील, श्री. कुलकर्णी, श्री. फाटक, प्राचार्य डॉ. तेंडोलकर, श्री. भोसले, डॉ. श्री. केदारी.