भाजपाचे बुजुर्ग नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अपोलोमध्ये दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली- माजी उप पंतप्रधान आणि भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात लालकृष्ण आडवाणी यांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युरिनमध्ये पेशींची वाढ झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे.त्यांची तब्येत बिघडल्यानंतर अपोलो रुग्णालयातील आयसीयुत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांना वयोपरत्वे अनेक व्याधी झालेल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांची प्रकृती नाजूक बनलेली आहे.
जे.पी. नड्डा यांनी केली चौकशी..
भाजपाचे बुजुर्ग नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शनिवारी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ येथील अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे. अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ न्युरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी आडवाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटले आहेत. लालकृष्ण आडवाणी हे ९७ वर्षांचे आहेत, गेल्या ४ ते ५ महिन्यात ते चौथ्यांदा आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी त्यांना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल केले होते.
लालकृष्ण आडवाणी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणे बंद केले होते. ते घरीच आराम करीत होते. लालकृष्ण आडवाणी यांना याच वर्षी देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. परंतू प्रकृती ठीक नसल्याने ते या हा पुरस्कार घेण्यासाठी देखील कार्यक्रमात येऊ शकले नाही. अखेर राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन आडवाणी यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
आडवाणी यांचा प्रवास…
लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपाला वाढविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून ( आरएसएस ) स्वयंसेवक म्हणून आपले राजकीय करीयर सुरु केले होते. १९४७ मध्ये ते आरएसएसचे सचिव बनले. साल १९७० मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. भाजपाची स्थापना १९८० मध्ये ते सर्वाधिक काळ भाजपाचे अध्यक्ष राहीले.साल १९९८ ते २००४ पर्यंत ते गृहमंत्रालयाचे मंत्री होते. तसेच २००२ ते २००४ पर्यंत ते उप पंतप्रधान होते. साल २०१५ मध्ये त्यांना पद्म विभूषणने सन्मानिक करण्यात आले. तसेच २०२४मध्ये त्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.