
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर रेल्वे स्थानकानजीक एका संशयित टेम्पोची तपासणी करून सुमारे १४ पोत्यांमध्ये लपवून नेण्यात येणारा सुमारे ६०,९८४ रुपयांचा गुटखा येथील पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. याप्रकरणी येथील पोलिस शिपाई तुषार झेंड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रेल्वे स्थानक ते खेड मार्गावर संशयित आरोपी अविनाश दादासाहेब पारेकर (२१, रा. बेवनूर, ता. जत, जि. सांगली) हा मालवाहू टेम्पो (एमएच १०, टीडी ६६७८) घेऊन जात असताना पोलिसांनी त्याची गाडी थांबवून तपासणी केली. त्यामध्ये १४ पोत्यांमध्ये प्रत्येकी २२ पाकिटे, असे ३०८ पाकिटे पानमसाला सापडला.