,कोकण हरत नाही! हरले नाही!! हरणार नाही!!!..

Spread the love

दिला शब्द बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला पूर्ण! १६ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन गणपती उत्सवापूर्वीच केली वाहतुकीला खुली!!

अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग.
जेव्हा सगळे आपल्या हरण्याची वाट बघत असतात तेव्हा जिंकण्यातली मजा काही औरच असते. मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न चांगलाच पेटला होता. आव्हानांचं वादळ घोंघावत होतं. जे पाप मुळातच आजचे विद्यमान बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचं नव्हतंच, ते त्यांच्या डोक्यावर थापण्यासाठी मोर्चेबांधणी झाली, तोफांची तोंडे त्यांच्या दिशेने वळवली गेली….

पण… कुठलीही कारणं सांगत न बसता, रविंद्र चव्हाण थेट प्रश्नाला भिडले! आव्हान स्वीकारलं!!

मी हरलो तर कोकण हरेल! आणि आई भराडीचा आशीर्वाद कोकणला हरु देणार नाही!!

हेच ते शब्द होते. रविंद्र चव्हाण नावाचा माणूस जेव्हा आव्हानाला भिडतो तेव्हा काय होतं, हे त्यांना ओळखणाऱ्यांना फार पूर्वीपासून माहीत होतं. महाराष्ट्राच्या सत्तेलाही ते अलिकडच्या काळात समजायला लागलं होतं. अशाच काही “समजूत”दार माणसांनी आता हायवे होणार हे उमगून क्रेडिट घेण्यासाठी आंदोलनं.. तोडफोड… भाषणबाजी चालवली.

.. आणि अपेक्षेप्रमाणे सर्वस्व पणाला लावून रविंद्र चव्हाण यांनी बोलल्याप्रमाणे अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची एक लेन चतुर्थीपूर्वी चालू करून दाखवली. एवढेच नव्हे तर कशेडी बोगदाही कार्यान्वित केला.

अर्थात, हे जादूची कांडी फिरवून नाही झालं. काळजातली आग कोणालाच बाहेर दिसली नाही. तहानभूक विसरून तिथे मांडलेली ठाण, सर्वांना विश्वासात घेत डोक्यावर ठेवलेला बर्फ, प्रत्येक आव्हानातून हिमतीने काढलेला मार्ग, बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेचा केलेला सीमांत वापर… एक मंत्री म्हणून हे यश एकशे एक टक्के रविंद्र चव्हाण यांचे होते! पण…

तरीही त्यांच्यातल्या जमिनीवर पाय असलेल्या माणसाने या कामाचे श्रेय आपल्यासोबत मेहनत घेतलेल्या आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं. त्यांचं कौतुक करायला ते विसरले नाहीत.

एक निश्चित! त्यांनी आव्हान जिंकलंय… त्यांच्या भाषेत बोलायचं झालं, तर मी ही कोकणीच आहे.. माझ्यातही ती “खुजली” आहे. कोकणी माणसाची खुजली काय असते ती यापूर्वी एकदा नारायणराव राणेंनी दाखवून दिली होती, आता पुन्हा एकदा प्रत्येक कोकणी माणसाची छाती अभिमानाने फुलावी अशा पद्धतीने आव्हानाला भिडून अन आव्हान जिंकून रविंद्र चव्हाण यांनी कोकणी माणसाची खुजली काय असते ती दाखवली… आणि समोरच्या प्रत्येकाची खुजली भागवली सुद्धा!!

त्यांनी श्रेय आपल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं असलं, तरीही त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीची जाणीव कोकणी माणसाला आहे. सर्व थरातून आज त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. शब्दश: सलाम!!

आज कोकणला अभिमान वाटावा असा मंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. कोकण हरले नाही… हरणारही नाही! असा मंत्री होणे नाही!!

गणपती बाप्पा मोरया… चला गणेशोत्सवासाठी जाऊया!!

सुरक्षित या! आनंदात या

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page