
मुंबई- राज्यात पुढील चार दिवस विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा तीव्र अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
आज संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड ठाण्यातही येलो अलर्ट आहे. पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
1 जुलै: रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती नागपूर भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
2 जुलै: सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर सातारा पुणे व नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई ,पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट
3 जुलै: रायगड रत्नागिरी तसेच सातारा व पुणे घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व नाशिक घाट परिसर, संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
4 जुलै: चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, उर्वरित विदर्भात यलो अलर्ट, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडसह तळकोकण व पुणे, सातारा व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.