जाणून घ्या उटणं म्हणजे काय; त्याचे फायदे आणि औषधी गुण..

Spread the love

आयुर्वेदानुसार, प्रत्येक मनुष्याच्या शरीरात असलेले दोष लक्षात घेत उटण्याचा वापर केला पाहिजे. शरीर दोषानुसार तयार करण्यात आलेलं उटणं त्वचेचा पीएच लेवल बॅलन्स करतो.

पीएच लेवलमध्ये जेव्हा गडबड होते, तेव्हा त्वचेचे नुकसान होते आणि त्वचेच्या समस्या सुरु होतात.

उटण्याचे फायदे:-

1. त्वचा चमकदार बनवते

उटणं हे एक असं नैसर्गिक फेस मास्क आहे, ज्यामध्ये मोठ्याप्रमाणात औषधी गुण असतात. हे नियमितपणे लावल्यास त्वचा फ्रेश आणि कोमल राहते. उटण्यातील बेसन डेड स्किन हटवण्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर चंदन पावडर त्वचा गुळगुळीत करण्यास मदत करते. दूध स्किनवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते. हे सर्व त्वचा चमकदार किंवा ग्लोइंग बनवण्यास मदत करते.

2. स्वच्छ त्वचा:-

आपल्या प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. कुणाच्या चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या, मुरुम/पुरळ, मुरुमाचे डाग, ब्लॅकहेड्स, व्हाइट हेड्स आदी असतात. उटणं या सर्वांवर एक प्रभावी उपाय आहे. उटणं नियमितपणे लावल्यास आपली त्वचा स्वच्छ होते. त्याशिवाय उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचा टॅन झाली तर उटणं लावल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

3. तारुण्य टिकवेल:-

हळद जगातील सर्वात जुनं अँटी बायोटिक असल्याचे सांगितले जाते. हळदीत जखम बरं करण्याची जबरदस्त क्षमता आढळून येते. हळद उटण्यात वापरली जाणारी सर्वात आवश्यक सामुग्री मानली जाते. हळदीत अँटी एजिंग आणि अँटी ऑक्सिडंटचे गुण आढळून येतात. हळद त्वचेने गमावलेला ओलावा परत आणण्याबरोबरच ती चमकवतेही. त्यामुळे आपली त्वचा पूर्वीपेक्षाही तरुण दिसते. त्याचबरोबर ड्राय स्किनमध्ये पापुद्रे निघण्याची समस्या जाणवत असेल तर उटण्यामुळे ही समस्याही दूर केली जाऊ शकते. हळदीमुळे मिळणाऱ्या हजार गुणांपैकी ही काही मोजकी गुणधर्मे आहेत.

4. शरीरावरील अनावश्यक केस काढणे

उटणं शरीरावरील अनावश्यक केस हटवण्यासाठीही मदत करते. उटणं हे बॉडी हेअर रिमूव्हलची अत्यंत सौम्य, नैसर्गिक आणि सुरक्षित पद्धत आहे. त्याचबरोबर ही अत्यंत परिणामकारक आणि स्वस्तही आहे. पूर्वीच्या काळी नवजात बालकांच्या शरीरावरील केस काढण्यासाठी उटण्याचा वापर केला जात असत. या खास उटण्यामुळे त्यांच्या शरीरावरचे केस कायमचे काढले जात असत.

5. मुरुम, पुरळ रोखणं

उटण्यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत तर होतेच. त्याचबरोबर त्यात मुरुमांपासून बचाव करण्यासाठीचे नैसर्गिक गुणधर्म देखील आहेत. हळद आणि चंदनमध्ये अँटी बॅक्टीरियल आणि एँटी फंगल गुण आढळतात. हे त्वचा आतून स्वच्छ करुन मुरुम/पुरळ होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करतात.

6. त्वचेला गोरेपणा मिळतो

चंदन पावडरचा उपयोगही उटण्यात केला जातो. चंदन पावडर त्वचेच्या रोगांसाठी अत्यंत परिणामकारक असते. जर नियमितपणे उटणं लावण्यात आले तर त्वचेवरील छिद्रं मोकळी होतात आणि त्वचा निरोगी आणि तरुण राहण्यास मदत होते. त्याचबरोबर चंदन त्वचेच्या रंग सुधारण्यास विशेष मदत करते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page