केएल राहुलचा धमाका, भारतीय क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेला 10 वर्षांनी लोळवलं…

Spread the love

टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अचूक कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम केला आणि मालिका जिंकली. कॅप्टन केएलने यासह मोठा कारनामा केला आहे.

पार्ल/- भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत 5 वर्षांनी वनडे सीरिज जिंकण्याची कामगिरी केली. मालिका 2-2 ने बरोबरीत असल्याने तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी मालिकेच्या हिशोबाने महत्त्वाचा होता. दोन्ही संघांना विजयी होऊन मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली. संजू सॅमसन याने केलेल्या 108 धावांच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं. तर त्यानंतर अर्शदीप सिंह याने 4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 218 गुंडाललं आणि टीम इंडियाने सामना 78 धावांनी जिंकला.

टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत 2018 नंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने अखेरची वनडे मालिका ही विराट कोहली याच्या नेतृत्वात जिंकली होती. त्यानंतर आता केएल राहुल याच्या कर्णधारपदात टीम इंडियाने ही कामगिरी केली. कॅप्टन केएल राहुल याने या मालिका विजयासह दक्षिण आफ्रिकेचा 2022 मधील वचपा घेतला. तसेच दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बोलँड पार्क पार्ल येथे लोळवलं.

थोडक्यात पण सविस्तर…

विराट कोहली याने 2018 मध्ये टीम इंडियाला 6 वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5-1 अशा फरकाने विजय मिळवून दिला होता. त्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2022 मध्ये एकदिवसीय मालिका खेळली. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 3-0 ने पराभूत करत मालिका जिंकली.

निश्चितपणे त्या अपमानास्पद पराभवाचा राग केएलच्या डोक्यात होता. केएलने हा राग टीम इंडियाला मालिका जिंकून पूर्ण केला. इतकंच नाही, तर टीम इंडियाने न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेचा 10 वर्षांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला पार्लमध्ये 2013 मध्ये न्यूझीलंडने धुळ चारली होती. त्यानंतर आता 10 वर्षांनी केएलने आपल्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. केएलने अशाप्रकारे एका दगडात 2 पक्षी मारले.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन-

केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन-

एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page