
८ जानेवारीच्या राजापुर येथे दोन्ही जिल्ह्यांच्या होणाऱ्या एकत्रित शिव संकल्प अभियान नियोजन सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार : ना. उदय सामंत
कुडाळ (प्रतिनिधी)- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावरच लढवली जाणार आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे किरण सामंत यांचे नाव वरिष्ठांकडे देण्यात आले आहे. येत्या ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता राजापूर येथे दोन्ही जिल्ह्यांची एकत्रित शिव संकल्प अभियान नियोजन सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी सावंतवाडीत दिली.
महायुतीचा उमेदवार कोण असेल हे ठरविण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. सद्यस्थितीत दोन्ही जिल्ह्यातून एकमेव किरण सामंत यांचेच नाव देण्यात आले आहे. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महायुती ही निवडणूक लढविणार आहे. ८ जानेवारी रोजी राजापूर येथील शिव संकल्प अभियानास सिंधुुदुर्गातून दहा हजार शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्याचे नियोजन समिती, जिल्हा परिषद मतदार संघनिहाय करा,असे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना यावेळी सूचित करण्यात आले.