पर्थ | 24 नोव्हेंबर 2024- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सेशनमध्ये किंग कोहलीने पुनरागमन करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनेक महिन्यांनी पहिलं शतक झळकावले आहे. पहिल्या कसोटीत भारताने 530 धावांचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलिया समोर ठेवलं आहे. या स्टेडियमवर यशस्वी जयस्वाल 161, राहुल 77, कोहली 100, सुंदर 29, नितीश रेड्डी 38 यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाने 6 विकेट गमावून 529 धावांच तगड आव्हान ऑस्ट्रेलिया समोर ठेवले आहे.
तब्बल 16 महिन्यानंतर विराटच्या बॅटीतून हे शतक आलं आहे. या शतकाने टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेट ऑस्ट्रेलिसायाची झोप उडाली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्ट सामन्यातून विराट कोहलीने दमदार शतक ठोकलं आहे. विराट कोहलीने 143 बॉलमध्ये हे शतक ठोकलं आहे. या शतका दरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. या शतकानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या दिशेने फ्लाईंग किस देत, हे शतक साजरं केलं आहे. या शतकानंतर आता भारताच्या दुसऱ्या धावांची आघाडी वाढणार आहेत.
अनेक मालिकांमध्ये विराट कोहली अपयशी ठरला होता. त्याला अनेक सामन्यात मोठी खेळी करताच आली नव्हती. त्यामुळे विराटचा फ्लॉप परफॉर्मन्स सूरू होता.ज्याचा टीम इंडियाला मोठा फटका बसत होता. मात्र आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीला सूर गवसला आहे. विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. कोहलीचा फॉर्म परत आल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.