
चिपळूण (प्रतिनिधी): १९९९ मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध कारगिल सेक्टरमध्ये विजय मिळवून ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले. त्या ऐतिहासिक युद्धस्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोजी संपूर्ण देशभर ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो.
याच पार्श्वभूमीवर या वर्षीचा कारगिल विजय दिवस चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे शुक्रवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता साजरा करण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील विर नारी, विर माता-पिता, माजी सैनिक व वीरपत्नींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या बलिदानाचे स्मरण होईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता आणि विधवा यांनी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर