डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहिला मिळाली होती. पण आता ट्रम्प विजयी झाले आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी मंगळवारी (दि.5) मतदान झाले होते. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रामुख्याने लढत पाहिला मिळाली. आता या निवडणुकीचे निकाल समोर आले असून, डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले असून, त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे.
अमेरिकेची निवडणूक ही बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशी होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानही सुरळीतपणे पार पडले. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहिला मिळाली. या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सायंकाळी साडेपाचपासून मतदानाला सुरुवात झाली होती. इतकेच नाहीतर काही राज्यांमध्ये आज सकाळपर्यंत मतदानही सुरू होते.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत सुरू आहे. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यात इंडियाना आणि केंटकी राज्यांच्या काही भागांमध्ये 6 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 4.30 वाजता मतमोजणी सुरू झाली. यानंतर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी मतमोजणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.