
संगमेश्वर:- संगमेश्वर पत्रकार व सामाजिक कार्यकत्यांनी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे भेट देऊन गणरायांचे दर्शन
घेतले. व आरती संग्रह व पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक मा.सुरेश गावित यांचा सन्मान केला.



यावेळी ज्येष्ठ पत्रकार वहाब दळवी, लोकनिर्माण वृत्तपत्र तालुका प्रतिनिधी धनंजय भांगे सर, कल्याण तालुका प्रतिनिधी प्रसाद सदलगे,पत्रकार विशाल रापटे,तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी पत्रकार बंधुच्या वतीने पोलीसांनी गणेशोत्सव व ईद ए -मिलाद निमित्त केलेला बंदोबस्त या उत्कृष्ट कामगिरी बद्दल .मा पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्याकडे बोलता पोलीसांच्या सेवेची प्रशंसा केली. निर्विघण उत्सव पार पडो असे गणरायाच्या चरणी साकडे घातले.