चिपळुणात पत्रकारांची काळ्या फिती लावून निदर्शने
चिपळूण ः रिफायनरीच्या विरोधात वृत्तांकन केल्याच्या रागातून राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात घडवून हत्या केल्याचा संशय आहे. गृह खात्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी चिपळूणातील पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी काळ्या फिती लावून निदर्शने केली.
प्रांताधिकारी प्रविण पवार तसेच तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन देण्यात आले. या घटनेचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कायदेशिर कारवाई करावी, तसे न झाल्यास पत्रकारांच्यावतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना चिपळूण पत्रकार संघाचे नागेश पाटील, सुभाष कदम, राजेंद्र शिंदे, समीर जाधव, संदीप बांद्रे, महेंद्र कासेकर, संतोष सावर्डेकर, सुशांत कांबळे, संतोष कुळे, राजेश कांबळे, बाळू कोकाटे, अनिकेत शेलार, सुनिल दाभोळे आदी उपस्थित होते.
जाहिरात :