जानेवारी अखेरीस मालमत्ता करापोटी 591 कोटी इतकी विक्रमी वसुली

Spread the love

ठाणेकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मानले आभार

ठाणे (प्रतिनिधी) ठाणे महापालिकेचे महत्वाचे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर. यावर्षी महापालिकेने मागील संपूर्ण वर्षभरात जी वसुली केली होती ती वसुली यंदा जानेवारी 2023 अखेरपर्यत पुर्ण केली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देवून नागरिकांनी कर भरणा केल्याने आयुक्तांनी ठाणेकर करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अजूनही दोन महिने बाकी असून ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापर्यत मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी त्वरीत भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे असेही त्यांनी नमूद केले आहे.

मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी बैठका घेवून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते व त्यानुसार योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती तसेच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती. आयुक्त श्री. बांगर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणेकरांनी मालमत्ता कराचा भरणा केल्याने मागील वर्षीच्या तुलनेत जानेवारी 2023 अखेरीस महापालिकेने 110 कोटीचा अधिकचा मालमत्ता कर वसुल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

यावर्षी दि. ३१.०१.२०२३ पर्यंत रु. ५९१ कोटी मालमत्ता कर वसुल झाला आहे.  मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१.०३.२०२२ पर्यंतची वसुली ही ५९१ कोटी होती, ती या वर्षी जानेवारी महिन्यातच पूर्ण केली आहे, त्यामुळे  मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ११० कोटींनी अधिकचा मालमत्ता कर वसुल झालेला आहे. 

यामध्ये चालू वर्षी उथळसर प्रभाग समिती 39.88 कोटी, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती 72.26 कोटी, कळवा प्रभाग समिती 20.46 कोटी, मुंब्रा प्रभाग समिती 24.31 कोटी, दिवा प्रभाग समिती 26.78 कोटी, वागळे इस्टेट प्रभाग समिती 19.53 कोटी, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती 22.99 कोटी, वर्तकनगर प्रभाग समिती 84.65 कोटी, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती 206.37 कोटी व मुख्यालयाकडे 75.66 कोटींची वसुली झालेली आहे.

अद्याप देखील काही करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही, तरी अशा करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  तरी मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळणेच्या दृष्टकोनातून ज्या मालमत्ताधारकांनी आद्यपपर्यंत आपला मालमत्ता कर भरलेला नाही, अशा करदात्यांनी लवकरात लवकर मालमत्ता कर महापालिकेकडे भरुन महापालिकेस सहकार्य करावे. 

90 टक्के वसुली धनादेश, डी.डी , ऑनलाईनद्वारे

नागरिकांना सुलभरित्या कर भरता यावा ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच Google pay, phonePe, Paytm, व Bhim App द्वारे ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरणेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिला असून घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने तसेच धनादेश, डी.डी. च्या माध्यमातून 90 टक्के कर भरणा केला आहे. तर 10 टक्के कर भरणा महापालिकेच्या प्रभागस्तरावरील संकलन केंद्राच्या माध्यमातून जमा झाला असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.

महापालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेले व प्रस्तावित प्रकल्प कामांबाबतही वेळोवेळी बैठका घेवून  युद्धपातळीवर कामे करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.  गेल्या चार महिन्यापासून शहरातील विविध कामे प्रगतीपथावर असून याचा बदल ठाणेकरांना अनुभवयास मिळत आहे. खड्डेमुक्त ठाणे, सौंदर्यीकरण, स्वच्छ शौचालये कामांबरोबरच भिंतीवरील आकर्षक चित्रे नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून येणाऱ्या काळात ठाणेकरांना शहराचे नवे रुप पहावयास मिळणार आहे. शहरातील नियोजित कामे वेळेवर पूर्ण व्हावीत याकडे लक्ष देत असतानाच महापालिकेची आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी विविध स्वरुपाचे कर, अनुदाने प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातूनही प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page