
ठाणे: वृत्त व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा संघटकपदी दैनिक साम्राज्य तसेच क्राईम सूत्रचे कार्यकारी संपादक श्री.विकास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.अरुण ठोंबरे यांच्या हस्ते उल्हानगर संघटनेच्या कार्यालय येथे मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.यावेळी ठाणे जिल्हाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.जाफर वणू, महासचिव श्री.रामेश्वर गवई, जनशक्तीचा दबाव पत्रकार श्री.निलेश पांडूरंग घाग सह अनेक पत्रकार उपस्थित होते. नियुक्तीनंतर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, श्री.विकास जगताप यांच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपली पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द तसेच सामाजिक कार्याची आवड पाहून व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली
जाहिरात

