भाजपावर JMM भारी; झारखंडमध्ये एनडीएचा दारूण पराभव!…

Spread the love

झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत होत आहे. काही एक्झिट पोल्सनुसार झारखंडमध्ये भाजपा युतीला ४२-२४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस आघाडीला २५ ते ३० तर इतरांना १-४ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

झारखंड- मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरेच चर्चेत आले होते. ते तुरुंगवासात होते तेव्हा त्यांच्या जागी चम्पाई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना झारखंडमध्ये मात्र भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. झारखंडचे जेएमएम पक्षाचे आजी माजी मुख्यमंत्री जिंकले असून या पक्षाला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. सत्ता कायम ठेवण्याचा राज्याचा इतिहास जेएमएम पक्षाने मोडला आहे.

JMM-काँग्रेस युतीने ६० जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी येथे ४२ जागांची आवश्यकता आहे. तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA ने २१ जागांवर विजय मिळवला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत JMM-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (RJD) युतीने ४७ जागा जिंकल्या. जेएमएमने स्वबळावर ३० जागा जिंकल्या होत्या. तर, २०१४ मध्ये १९ जागा होत्या. भाजपला ८१ पैकी फक्त २५ जागा मिळवता आल्या होत्या.

झारखंड विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यात ३८ जागांसाठी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले. १२ जिल्ह्यांतील १४ हजार २१८ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत झाले. राज्यात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया ’ आघाडीचा सामना भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्य लढत झाली. दोन संस्थांचा अपवाद वगळता बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी राज्यात सत्तांतर होईल असे भाकीत वर्तवले होते. परंतु, सत्तांतर झालेले नाही. प्रत्येक निवडणुकीत नवं सरकार स्थापन करण्याचा या राज्याचा इतिहास आहे. मात्र, या इतिहासाची पुनर्रावृत्ती यंदा झाली नाही. कारण, पुन्हा सोरेन यांच्या जेएमएम-काँग्रेस युतीने येथे सत्ता काबिज केली आहे.

मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी पाहिली तर राज्यात भाजप ४५ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता. झारखंड मुक्ती मोर्चाला सत्ताविरोधी लाटेचा फटका बसेल असा या चाचण्यांचा अंदाज होता. राज्यातील प्रचारात भाजपाने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लक्ष्य केले होते. त्याचबरोबर घुसखोरीची समस्या केंद्रस्थानी ठेवत, प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य असलेले माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले होते. राज्यातील आदिवासी समुदायाच्या लोकसंख्येत बदल झाल्याचा आरोप भाजपाने प्रचारात करत विरोधी इंडिया आघाडीपुढे आव्हान उभे केले होते. परंतु, भाजपाचे प्रयत्न येथे अपयशी ठरले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page