राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती, अखेर येत्या पाच डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ यश मिळालं. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. दरम्यान स्पष्ट बहुमत असून देखील अजूनही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाहीये. नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार यासंदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. अखेर आता तारीख समोर आली आहे. येत्या गुरुवारी पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान जरी नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असली तरी देखील अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यापूर्वीच शपथवीधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
अजून मंत्र्यांची खाती निश्चित झालेली नाहीयेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. जर गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका आहे, या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांमध्ये महायुतीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे, मात्र त्यापूर्वीच भाजपकडून मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून अद्याप गटनेता देखील निवडण्यात आलेला नाहीये. तसेच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा देखील करण्यात आलेला नाही, मात्र त्यापूर्वी आता नव्या सरकारच्या शपथवीधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
गृहमंत्रिपद कोणाला मिळणार?…
समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी अग्रही आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका आहे. गृहमंत्रिपद शिवसेनेला न मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेनेचा एखादा दुसरा ज्येष्ठ नेता स्विकारण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपदासोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत देखील सस्पेन्स कायम आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र अजूनही कोणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये, मात्र दुसरीकडे शपथविधी सोहळ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.