संगमेश्वर कडवई : मुंबई गोवा महामार्गावर काल संध्याकाळी ४.३० वाजता मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने एर्टिगा गाडीला जोरदार धडक दिल्याने एर्टिगा गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबईकडून गोव्याकडे चाललेला कंटेनर चालक श्रीराम दीनदयाळ गुप्ता (वय ५६ ) राहणार उत्तरप्रदेश हा आपल्या ताब्यातील कंटेनर जी.जे.१५ ए व्ही ७६२५ घेऊन जात असताना तुरळ डिकेवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात एर्टिगा गाडीला धडकला.एर्टिगा गाडी नंबर एम एच ०८ ए एक्स ५७३४ ही मालक अरमान सलीम शेख राहणार कळंबस्ते,चिपळूण व त्यांच्यासोबत संजय दत्ताराम सावंत राहणार वालोपे हे दोघे रत्नागिरीहून चिपळूणला चालले होते.कंटेनर धडकेत एर्टिगा गाडीच्या उजव्या बाजूचे मोठ्या नुकसान झाले व चालक अरमान शेख व संजय सावंत हे किरकोळ जखमी झाले.
अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पुलिस हवालदार एस.एस. कोलगे व पोलीस कॉनस्टेबल एस. डी.खाडे यांनी त्वरित पोहचून वाहने बाजूला करून जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात भरती केले.पुढील तपास एस.एस.कोलगे करत आहेत.