चिपळूण (प्रतिनिधी):- भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खेर्डी पंचायत समिती गणाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला खेर्डीतील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी या सर्वांनी राणेंना गणातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला माजी आमदार शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, महिला प्रदेश सरचिटणीस सौ.दिशाताई दाभोळकर, तालुका अध्यक्ष नितीन (आबू) ठसाळे, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.स्नेहाताई मेस्त्री, मनसेचे शहर अध्यक्ष अभिनव भुरण,माजी सरपंच, सुनील मेस्त्री, माजी सरपंच रविंद्र फाळके, माजी सरपंच दशरथशेठ दाभोळकर, माजी सरपंच प्रकाश पाथरवट, माजी सरपंच सौ.वृंदा दाते, माजी उपसरपंच अनंत दाते, अर्बन बँक व्हाइस चेअरमन निलेश भुरण, खेर्डी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ दाते, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अनंत भुरण आणि या सभेचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस विनोद भुरण उपस्थित होते.
तसेच खेर्डी येथील प्रतिष्ठित नागरिक, आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य, बाजारपेठेतील व्यापारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांची उपस्थिती देखील मोठ्या संख्येने होती. महायुतीच्या माध्यमातून राणेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा निर्धार सर्वांनी एकजुटीने केला.