इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरू असलेलं युद्ध तत्काळ थांबवण्यात यावं, असा ठराव संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं घेतला आहे. रमजान महिन्यात हे युद्ध थांबवण्यात यावं, असं या ठरावात नमूद करण्यात आलं आहे.
न्यूयॉर्क Israel Gaza War : इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं या युद्धात हस्तक्षेप करण्याचं ठरवंल आहे. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषदेनं रमजानच्या काळात इस्रायल हमास दरम्यान तत्काळ युद्धबंदी करण्याचा ठराव संमत केला आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान सुरु असलेलं युद्ध थांबणार का, याकडं जगाचं लक्ष लागून आहे.
इस्रायल गाझा युद्ध थांबवण्याचा ठराव :
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. या युद्धात अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं गाझामध्ये सुरु असलेलं युद्ध तत्काळ थांबवण्याचा ठराव सादर करण्यात आला. या ठरावाच्या बाजुनं 14 मतं पडली. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी “हा प्रस्ताव लागू केला पाहिजे,” असं स्पष्ट केलं.
अमेरिकेनं केलं नाही प्रस्तावावर भाषण :
गाझामध्ये मागील सात महिन्यापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळत आहे. सध्या रमजान महिना सुरू असून नागरिक रमजान महिन्याला पवित्र मानतात. मात्र युद्ध सुरू असल्यानं हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं ठराव सादर केला. या ठरावाकडं अमेरिकेनं पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं. अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र संघाच्या या प्रस्तावावर भाषण केलं नाही.
हिंसाचार भडकावणाऱ्यांवर कठोर निर्बंध लादण्याची मागणी :
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं सादर केलेल्या ठरावाला 14 देशांच्या प्रतिनिधींनी संमती दर्शवली. यावेळी येमेनचे प्रतिनिधी अब्दुल्ला अली फदेल अल-सादी यांनी “कायमस्वरुपी युद्धविरामावर ठराव आणण्यासाठी हा ठराव पहिला टप्पा आहे. युद्धबंदी करुन सर्व ओलिसांची सुटका करण्यात यावी. या ठरावाचं त्वरित पालन करण्यात यावं. इस्रायलींनी नागरिकांचा नरसंहार करत हे युद्ध सुरू ठेवलं आहे. या युद्धात महिला आणि मुलांना लक्ष्य करण्यात आलं. त्यांची उपासमार करण्यात आली. त्यामुळे हिंसाचार भडकावणाऱ्या इस्रायलींवर कठोर निर्बंध लादण्यात यावेत,” असं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेला केलं.