दिनांक 28 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशीभविष्य मधून ‘या’ राशीच्या जोडीदारांचा दिवस जाईल सुखात; वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणं-फिरणं आणि सगळंच मनासारखं मिळू शकेल. आयात-निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ आणि यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ आणि वाहनसुख मिळेल. वाद – विवादापासून दूर राहणं हिताचं ठरेल.

▪️वृषभ :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्‍यांचं सहकार्य मिळेल.

▪️मिथुन :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख शांती राहील. पत्नीसाठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी – व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. उत्तम भोजन आणि वैवाहिक सुख मिळेल.

▪️कर्क :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणं किंवा अन्य विकारामुळं कुटुंबात अशांतीचं वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्यानं दुःख होईल. वेळेवर जेवण मिळणार नाही. निद्रानाश होईल. धन खर्चाची आणि अपयशाची शक्यता आहे.

▪️सिंह :

आज चंद्र राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कार्यातील यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्यानं आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळं आपण खुश व्हाल. शांत चित्तानं नवीन कामाचा आरंभ करा. अचानक नशिबाची साथ मिळेल.

▪️कन्या :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळं लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. हौस – मौज यावर खर्च होईल. अवैध प्रवृत्ती पासून दूर राहावं.

▪️तूळ :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र आणि कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र आणि वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास आणि कार्य साफल्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील.

▪️वृश्चिक :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. कोर्ट-कचेरी प्रकरणात सांभाळून काम करणं उचित ठरेल.

▪️धनू :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख – शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी आणि वडीलधारी यांची मर्जी राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्तीमुळं आनंद वाटेल.

▪️मकर :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यापार – व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणा संबंधी समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

▪️कुंभ :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी आणि उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज – मस्ती हिंडण्या – फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून आनंददायी बातम्या येतील. संतती विषयक समस्या सतावेल. प्रतिस्पर्ध्यांशी जास्त वादविवाद करू नका.

▪️मीन :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आरोग्याकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभानं आपला त्रास दूर होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page