
देवरुख | फेब्रुवारी २५, २०२३.
शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत भारत व स्वीडनमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. सदर कार्यशाळेत स्वीडनमधील शिक्षण व्यवस्था, पर्यावरण विषयक अभ्यास व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा व प्रात्याक्षिक सादर केले जाणार आहे. या परदेशी अभ्यासकांना महाराष्ट्रीयन लोककला, खाद्यसंस्कृती, पेहराव यांचीही ओळख यानिमित्ताने करून देण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस आपण उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. धनंजय दळवी यांनी केले आहे.
स्थळ- स्व. अ. अ. पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूल व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, देवरुख मधील ए. के. जोशी अॅक्टिव्हिटी हॉल.
वेळ- दुपारी २.३० ते सायंकाळी ७.०० वा.