कोलंबिया, श्रीलंका- भारताने पाकिस्तानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय आशिया चषकाच्या सुपर-4 सामन्यात संघाने पाकिस्तानी संघाचा 228 धावांनी पराभव केला. यापूर्वी हा विक्रम 140 धावांचा होता, जो भारताने 2008 मध्ये मीरपूरच्या मैदानावर केला होता.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 2 बाद 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 32 षटकांत केवळ 128/8 धावा करू शकला. संघाचे दोन फलंदाज दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत.
भारत-पाकिस्तान सुपर-4 सामन्याचे स्कोअरकार्ड
अशा पडल्या पाकिस्तानच्या विकेट
पहिली: इमाम-उल-हक (9 धावा): जसप्रीत बुमराह पाचव्या षटकात राउंड द विकेटवरून गोलंदाजी करायला आला. त्याने दुसरा चेंडू आऊट-स्विंगरला ऑफ स्टंपच्या बाहेर चांगल्या लांबीवर टाकला. इमाम बचावासाठी गेला, पण चेंडू बॅटच्या बाहेरील काठाला स्पर्श करून दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुभमन गिलच्या हातात गेला.
दुसरी: बाबर आझम (10 धावा): 11व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पंड्याने गोलंदाजी केली. गुड लेन्थ इनस्विंग बॉल खेळू शकला नाही आणि बॉल स्टंप उखडून गेला.
तत्पूर्वी भारताने या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचे आव्हान उभे केले आहे. राखीव दिवशीही पावसामुळे सामना सुरू व्हायला जवळपास दीड तास उशीर झाला. मात्र त्यानंतर कोहली आणि राहुलने तुफान फलंदाजी करत धावांचा डोंगर उभा केला. दोघांनीही आपली शतके पूर्ण केली. कोहलीने 47 वे वन डे शतक केले. तर राहुलनेही दुखापतीतून सावरताना शतकी खेळी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची भागिदारी केली.
कोहली-राहुलने सावरले
रविवारी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 2 बाद 147 धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पुढे डावाला सुरुवात केली. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर दोघांनी भारताचा डाव सावरला आहे. केएल राहुलने दुखापतीतून सावरत शतक केले. तर कोहलीने 47 वे वन डे शतक पूर्ण केले. पाकिस्तानविरोधातील सर्वात मोठी भागिदारी कोहली आणि राहुलने केली आहे.
हारिस रऊफ खेळला नाही
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आज खेळला नाही. तो जखमी असल्याची माहिती आहे. रऊफला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पहिल्या दिवशी त्याने 5 ओव्हर गोलंदाजी केली होती.
रिजर्व-डेलाही दीड तास उशीर, हीटरने वाळवले पिच
सामन्यापूर्वी ग्राऊंड स्टाफने मैदान तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले. 3:44 वाजता पाऊस थांबल्यानंतर अंपायर्सने दोन वेळा मैदानाचे निरीक्षण केले. सायंकाळी 4:40 वाजता खेळ सुरू करण्याचा निर्णय झाला. ठरलेल्या वेळेपेत्रा म्हणजे 3 वाजेनंतर दीड तास उशिरा सामना सुरू झाला.
ग्राउंड स्टाफने 5 तास मैदान कोरडे केले
पहिल्या दिवशी भारतीय डावात दुपारी ४.५२ वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे मैदानाचा काही भाग ओला झाला. ग्राउंड स्टाफ सुमारे 4 तास ते भाग कोरडे करण्याचा प्रयत्न करत होता. पंख्याच्या हवेने ती जागा सुकवण्याचा प्रयत्न झाला.
या काळात पंचांनी अनेकवेळा मैदानाची पाहणीही केली. रात्री साडेआठ वाजता चौथ्यांदा पाहणी करत असताना पाऊस परतला आणि सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय झाला.
ग्राउंड स्टाफ 30 यार्ड वर्तुळाचा काही भाग पंख्याच्या हवेने कोरडे करण्याचा प्रयत्न करताना
ग्राउंड स्टाफ 30 यार्ड वर्तुळाचा काही भाग पंख्याच्या हवेने कोरडे करण्याचा प्रयत्न करताना
रोहित आणि गिल अर्धशतक झळकावून बाद झाले
सामना थांबण्यापूर्वी प्रथम खेळणाऱ्या टीम इंडियाने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहे.
शुभमन गिल ५८ धावा करून बाद झाला. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला सलमान अली आगाकरवी झेलबाद केले. तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मा (56 धावा) फहीम अश्रफच्या हाती शादाब खानकरवी झेलबाद झाला.
58 धावा करून गिल आऊट झाला, त्याने 8 वे अर्धशतक केले
शुभमन गिल ५८ धावा करून बाद झाला. त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक पूर्ण केले. गिलने 52 चेंडूत 10 चौकार मारले.
रोहितने मिडविकेटवर षटकार ठोकत आपले 50 वे अर्धशतक पूर्ण केले
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या वनडे कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक झळकावले. त्याने मिडविकेटवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 49 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
सलामीवीरांनी सलग दुसरी शतकी भागीदारी केली
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला वेगवान सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्येच पन्नासची भागीदारी केली. पॉवरप्लेनंतर रोहित शर्माने शादाब खानविरुद्ध 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. रोहितने कारकिर्दीतील 50 वे अर्धशतक पूर्ण केले, मात्र 56 धावा करून शादाब खानचा बळी ठरला.
रोहितच्या विकेटसह त्याची शुभमनसोबतची १२१ धावांची भागीदारी तुटली. या दोघांनी गेल्या सामन्यात नेपाळविरुद्ध 147 धावांची शतकी भागीदारी केली होती. रोहित-गिलची ही ५वी शतकी भागीदारी आहे.
रोहितपाठोपाठ शुभमन गिलही 18व्या षटकात 58 धावा काढून बाद झाला. तो शाहीन आफ्रिदीकरवी झेलबाद झाला.
पॉवरप्लेमध्ये गिलने स्फोटक सुरुवात केली
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या शुभमनd गिलने टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली. रोहितने पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीविरुद्ध षटकारही ठोकला. शाहीनच्या 2 षटकांत गिलने 3-3 चौकार मारले. संघाने 10 षटकांनंतर बिनबाद 61 धावा केल्या.
अशा प्रकारे भारताच्या विकेट पडल्या
पहिली (रोहित शर्मा- 56 धावा): शादाब खानने 17 व्या षटकातील चौथा चेंडू फुलर लेन्थ उडवून टाकला. रोहितला फहीम अश्रफने लाँगऑफवर झेलबाद केले.
दुसरी (शुभमन गिल- 58 धावा): शाहीन शाह आफ्रिदीने 18व्या षटकातील पाचवा चेंडू गुड लेंथवर स्लोअर टाकला. शुभमनला सलमान अली आगाने कव्हर्सवर झेलबाद केले.
टीम इंडियाने 2 बदलांसह प्रवेश केला..
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद शमीच्या जागी जसप्रीत बुमराहला खेळवण्यात आले आहे. नाणेफेकनंतर रोहित म्हणाला- ‘आम्हाला नाणेफेक जिंकून फलंदाजी करायची होती. सर्व सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11…
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ.