
नवी दिल्ली – भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (६ ऑगस्ट) भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादत असल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी याआधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्याच्या १४ तास आधी ट्रम्प यांनी हा नवा आदेश काढला आहे. आधीच्या २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी आजपासून (७ ऑगस्ट) सुरू झाली आहे, तर अतिरिक्त कराची अंमलबजावणी व्हाइट हाऊसमधून आदेश निघाल्यापासून २१ दिवसांनी केली जाईल.

दरम्यान, यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी ट्रम्प यांच्या अरेरावीला संयमी उत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले, “भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हिंतांबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही.” मोदी यांची ही टिप्पणी थेट वॉशिंग्टनसाठी संदेश असल्याचं मानलं जात आहे.
मोदींकडून ग्रामीण भारताच्या संरक्षणाची जबाबदारी अधोरेखित
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या, मच्छिमारांच्या हितांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मला जाणीव आहे की यासाठी मला मोठी किंमत मोजावी लागेल. परंतु, मी त्यासाठी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहे.” वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भारताच्या, खेड्यांमधील समुदायांच्या संरक्षणाच्या जबाबदारीबाबतचा सरकारचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केला.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर