फायनल जिंकण्यासाठी आता भारतीय संघात पाचच मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
१७ सप्टेंबर/कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (रविवारी) विजेतेपदासाठी अंतिम लढत रंगणार आहे. टीम इंडियाने गेल्या पाच वर्षांत एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही, किताबाचा हा दुष्काळ संपवण्यासाठी रोहितसेना मैदानात उतरणार आहे; तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली गेलेली पत पुन्हा मिळवण्यासाठी श्रीलंकेला मोठी संधी मिळाली आहे. या दोघांच्या युद्धात आशियाचा राजा कोण ठरणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 166 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 97 सामने जिंकले आहेत. याशिवाय श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. 11 सामन्यांचा निकाल जाहीर झाला नाही आणि 1 सामना बरोबरीत संपला. या आशिया कपमध्ये भारताने सुपर फोर फेरीत श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला.
फायनल जिंकण्यासाठी आता भारतीय संघात पाचच मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
फायनलसाठी भारतीय संघात नेमकी कोणाला मिळणार संधी जाणून घ्या…
आशिया कप जिंकण्यासाठी आता भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यामुळे आता भारतीय संघात अंतिम फेरीसाठी तब्बल पाच बदल करण्यात येणार आहे. भारतीय संघाच्या Playing Xi मध्ये नेमकी कोणाला संधी मिळणार आहे, हे आता समोर आले आहे.
पहिला बदल…
आशिया कपच्या फायनलसाठी भारतीय संघात पहिला बदल हा सूर्यकुमार यादवच्या रुपात होणार आहे. कारण गेल्या सामन्यात त्याला संधी दिली होती. पण या संधीचा फायदा मात्र त्याला घेता आला नाही. त्यामुळे फायनलसाठी त्याला संघाबाहेर केले जाईल आणि भारतीय संघात अनुभवी विराट कोहलीची एंट्री होणार आहे. त्यामुळे हा पहिला बदल आता भारतीय संघात होणार आहे.
दुसरा बदल….
भारतीय संघात दुसरा बदल हा तिलक वर्माच्या रुपात होणार आहे. कारण तिलकला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली होती. पण या सामन्यात त्याला टी-२० क्रिकेटच्या खेळासारखी छाप पाडता आली नाही. पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे आता फायनलसाठी मात्र त्याला संघाबाहेर केले जाईल, ही गोष्ट समोर येत आहे.
तिसरा बदल…
भारतीय संघात तिसरा बदल हा अष्टपैलू खेळाडूसाठी होणार आहे. कारण भारताने वॉशिंग्टन सुंदरला थेट मायदेशातून फायनलसाठी बोलावून घेतले आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला या फायनलमध्ये संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पण त्याला जर संघात घेतले तर कोणाला वगळायचे, हा मोठा प्रश्न पडू शकतो. पण जर सुंदरला संघात स्थान दिले तर शार्दुल ठाकूरसारख्या अष्टपैलू खेळाडूला संघाबाहेर जाऊ लागू शकते.
चौथा बदल….
भारतीय संघात चौथा बदल हा कुलदीप यादवच्या रुपात होणार आहे. कारण गेल्या सामन्यात कुलदीपला खेळवण्यात आले नव्हते. पण गेल्या सामन्यात खेळवण्यात आलेल्या अक्षर पटेलला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादव हा संघात दिसेल.
पाचवा बदल…
भारतीय संघात पाचवा बदल हा वेगवान गोलंदाजी होणार आहे. कारण गेल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली होती. आता फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात मात्र बुमराहला पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. पण बुमरा यावेळी संधी देताना मोहम्मद शमी किंवा मोह्ममद सिराज यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागू शकते.
फायनलच्या सामन्यासाठी आता किती बदल भारतीय संघात केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.