इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, अर्जाची प्रक्रिया…

Spread the love

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, अर्जाची प्रक्रिया

सरकारी बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ४७ पदांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी बँकेने अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे आणि अर्जाची प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइटला ippbonline.com भेट देऊ ऑनलाइन अर्ज भरू शकता. पण रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

▪️रिक्त पदांची संख्या – ४७

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ४७ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यापैकी २१ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, ४ रिक्त पदे EWS प्रवर्गासाठी, १२ रिक्त पदे ओबीसी प्रवर्गासाठी आणि ७ सीएस आणि ३ एसटी प्रवर्गासाठी आहेत.

“..तर मग आम्ही तुमच्याबरोबर येतो”, लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

▪️वयोमर्यादा-

उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

▪️अर्ज शुल्क-


इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७०० रुपये जमा करावे लागतील.
एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १५० अर्ज शुल्क भरावे लागेल.

▪️निवड प्रक्रिया-

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड पदवी गुण, गट चर्चा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.

▪️अर्ज कसा करावा..

१) IPPB भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट द्या.
२) होम पेजवर दिसणाऱ्या करिअर ऑप्शनवर क्लिक करा३) आता स्वत:च्या नावाची नोंदणी करा, अर्ज भरा.
४) सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
५) अर्ज फी जमा करा.
६) अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page