भारताने रचला इतिहास, २५ सुवर्णांसह जिंकली १०० पदकं, पंतप्रधान काय म्हणाले?..

Spread the love

चीन- टीम इंडियासाठी शनिवारची (७ ऑक्टोबर) सकाळ खूपच चांगली होती. तिरंदाजीतही भारताला दोन सुवर्णपदके मिळाली. यासह एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळाले.विशेष म्हणजे, टीम इंडियासाठी शनिवारची (७ ऑक्टोबर) सकाळ खूपच चांगली होती. तिरंदाजीतही भारताला दोन सुवर्णपदके मिळाली. यासह एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळाले.

भारताने २५ सुवर्णांसह १०० पदके जिंकली

एशियन गेम्स मध्ये भारतीय खेळाडूंनी १०० पदके जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने एकूण २५ सुवर्णपदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी शनिवारी सकाळी तिरंदाजीत दोन सुवर्णपदके जिंकली. यासह एक रौप्य आणि एक कांस्यपदकही पटकावले. भारताने क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, भालाफेक आणि नेमबाजीसह सर्व खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले.

आज ओजस देवतळेने जिंकले सुवर्ण पदक

आज तिरंदाजीत ओजस देवतळने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत अभिषेक वर्माचा १४९-१४७ असा पराभव केला. या विजयासह ओजसने सुवर्णपदक पटकावले. तर अभिषेकला रौप्यपदक मिळाले. यापूर्वी ज्योती वेन्ननने भारताला सुवर्ण मिळवून दिले होते. तिने कंपाऊंड तिरंदाजीत वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा पराभव केला. अदितीने शनिवारी भारताला पहिले पदक जिंकून दिले. तिने कांस्यपदक जिंकले. ज्योतीने ओजससोबत मिश्र सांघिक स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती. दोघांनी भारताला सुवर्णपदक जिंकले होते.

या भारतीय खेळाडूंनी केली सुवर्ण पदकांची कमाई

ऐश्वर्या तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पंवर यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत (शूटिंग) भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. यानंतर महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. दिव्यकीर्ती सिंग, हृदय विपुल छेड, अनुष अग्रवाल आणि सुदीप्ती हाजेला यांनी ड्रेसेज सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. मनू भाकर, ईशा सिंग, रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स ( नेमबाजी) मध्ये सिफ्ट कौर साम्राने सुवर्णपदक पटकावले. अविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये सुवर्ण आणि तेजिंदर पाल तूरने शॉटपुटमध्ये सुवर्ण जिंकले. यासोबतच भारताने स्क्वॉशमध्येही सुवर्णपदक जिंकले.

पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे.

पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारताने १०० पदके जिंकली आहेत. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनने ३५६ पदके जिंकली आहेत. चीनने १८८ सुवर्ण, १०५ रौप्य आणि ६३ कांस्य पदके जिंकली आहेत. जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपानने ४७ सुवर्णांसह १६९ पदके जिंकली आहेत. कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरियाने ३६ सुवर्ण, ५० रौप्य आणि ८६ कांस्य पदके जिंकली आहेत. त्यांनी एकूण १७२ पदके जिंकली आहेत.

पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले

आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी महिला कबड्डी संघ आणि तिरंदाजी संघाचे कौतुक केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. बिर्ला म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी १०० पदकांचा संकल्प पूर्ण केला आहे, आमचे खेळाडू आज जगात कोणाहीपेक्षा कमी नाहीत. त्यांची मेहनत आणि समर्पण देशाला अभिमानास्पद आहे. ती वेळ दूर नाही जेव्हा भारत प्रत्येक सामन्यात वर्चस्व गाजवेल’.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page