इंदोर- भारताने ऑस्टेलियाचा ९९ धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.
टीम इंडियाने ३९९ धावांचा डोंगर उभारल्यानंतर दिलेल्या ४०० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर पावसामुळे एक तासासाठी खेळ थांबविण्यात आला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला ३३ षटकात ३१७ धावांचं आव्हान देण्यात आलं. डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरेल्या ऑस्ट्रेलिया संघाची पडझड पुढेही कायम राहिली.
भारताचा फिरकीपटू आर. आश्विनच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज सहज फसला. आश्विनने मार्नस लाबुशेनला त्रिफळाचीत केले. लाबुशेनने ३१ चेंडूत २७ धावा कुटल्या. वॉर्नर आणि लाबुशेनने तिसऱ्या गडीसाठी ८० धावांची भागीदारी रचली. आश्विनने १५ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. पहिल्या चेंडूत डेव्हिड वॉर्नर आणि पाचव्या चेंडूत जॉशला बाद केले.
वॉर्नरने ३९ धावा कुटल्या तर जॉशनं ६ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ६ वा झटका एलेक्सच्या रुपाने बसला. त्याने १२ चेंडूत १४ धावा कुटल्या. कॅमरून ग्रीनही अवघ्या १९ धावांवर बाद झाला. कॅमरूनने १३ चेंडूत १८ धावा कुटल्या. रविंद्र जडेजानेही एडम जाम्पाला बाद केलं. सीएनने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फारसं यश आलं नाही. मालिकेचा दुसरा सामना टीम इंडियाने ९९ धावांनी जिंकला.